वाहतुकीला अडथळा ठरणारी पोलीस चौकी स्थानांतरित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2015

वाहतुकीला अडथळा ठरणारी पोलीस चौकी स्थानांतरित


मुंबई / प्रतिनिधी - महापालिकेच्या के/पूर्व विभागातील अंधेरी (पूर्वपरिसरात असणा-या ना.सी.फडके मार्ग व पश्चिम द्रुतगती मार्ग या दोन रस्त्यांच्या जंक्शनवर असणारी व वाहतुकीला अडथळा ठरत असलेली वाहतूक पोलीसांची चौकी स्थानांतरित करण्याचे काम आज दि.०५.११.२०१५ रोजी दुपारी पूर्ण करण्यात आलेही कार्यवाही तातडीने व वेळेत पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेला मुंबई पोलिसांचे व मुंबई वाहतुक पोलिसांचे विशेष सहकार्य लाभलेमहापालिका आयुक्त अजोय मेहता व पोलीस आयुक्त (मुंबईअहमद जावेद यांनी नुकताच सदर ठिकाणाचा दौरा केल्यानंतर वाहतूक पोलिसांची सदर चौकी स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


महापालिकेद्वारे सदर चौकी पाडून रस्ता मोकळा करण्यासाठी महापालिकेच्या के-पूर्व विभागाचे दहा कामगार व सात अधिकारी रात्रंदिवस कार्यरत होतेसदर चौकी द्रुतगती महामार्गावर असणा-या उड्डाण पुलाखाली तात्पुरत्या स्वरुपात स्थानांतरित करण्यात आली आहेयासाठी महापालिकेद्वारे चार कंटेनर्सची व्यवस्था करण्यात आली आहेतसेच याठिकाणी पाण्याची पाईपलाईनआवश्यक ती मलनि:सारण व्यवस्था यासह इतर आवश्यक बाबींची पूर्तता देखील महापालिकेद्वारे करण्यात आली आहेत्याचबरोबर संबधित विद्युत पुरवठादार कंपनीद्वारे विद्युत पुरवठ्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहेतसेच जुन्या चौकीच्या ठिकाणी रस्ता समतल करुन डांबरीकरण करण्याचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त अजोय मेहता व पोलीस आयुक्त (मुंबईअहमद जावेद यांच्यात नुकत्याच संपन्न झालेल्या एका बैठकी दरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली होतीयामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणा-या तसेच पादचा-यांना चालतांना त्रासदायक ठरु शकणा-या पोलीस चौक्या स्थांनातरित करण्याबाबत देखील चर्चा झाली होतीत्यानुसार आज पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पोलिस चौकी स्थानांतरित करण्यात आली आहेतसेच महापालिका व मुंबई पोलीस यांच्यात विविध बाबींवर सुसंवाद व समन्वय वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने नियमित समन्वय बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहेत्यानुसार आता दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी सर्व परिमंडळांमध्ये बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad