मुंबई - दिंडोशीतील जानू भोयेनगरातील एसआरए गृहनिर्माण संस्थेतील सदनिकांमध्ये सातत्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने रहिवासी विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत. वसाहतीतील शंभरपेक्षाही जास्त रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. काल (ता. 10) दूषित पाणी प्यायल्यामुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतापलेल्या रहिवाशांनी आज "रास्ता रोको‘ केला. नंतर त्यांनी कुरार पोलिस ठाण्यावर मोर्चा नेत दोषी पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करीत परिसर दणाणून सोडला. परिणामी काही काळ वातावरण तंग झाले होते.
दूषित पाण्यामुळे बालकाला जीव गमवावा लागल्याची खबर परिसरात पसरताच आज सकाळी रहिवाशांच्या असंतोषाचा भडका उडाला. मोठ्या संख्येने रहिवासी द्रुतगती मार्गावर चालून गेले. त्यांनी उत्स्फूर्तपणे "रास्ता रोको‘ केला. त्यानंतर त्यांनी कुरार पोलिस ठाण्याला धडक दिली. पालिकेविरोधी घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. दूषित पाण्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले. रास्ता रोको आणि पोलिस ठाण्यावरील मोर्चात मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. रहिवाशांनी दूषित पाण्याच्या बाटल्या हातात घेत
घोषणाबाजी केली.
रहिवासी रवी गुप्ता, केरोबा कट्टे आणि अजय उपाध्याय म्हणाले, की शांताराम तलावानजीक असलेल्या ओंकार एसआरए गृहनिर्माण संस्थेत काही महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. हळूहळू त्याचे प्रमाण वाढून 23 मजले असलेल्या इमारतीला दूषित पाण्याचा पुरवठा होऊ लागला. परिणामी रहिवासी आजारी पडू लागले. पालिका अधिकारी मात्र त्याबाबतच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याने आम्हाला रास्ता रोको करावा लागला. अनेकांमध्ये पोटदुखी, उलट्या-जुलाब, चक्कर आदी आजार बळावू लागले आहेत. काहींनी पालिकेच्या पी उत्तर विभागाच्या दोन्ही कार्यालयांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या लेखी तक्रारी दिल्या. मी स्वतः पालिकेत दूरध्वनी करून त्याबाबत तक्रार केली होती, असे उपाध्याय यांनी सांगितले.
27 ऑक्टोबरपासून दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी करूनही पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला. एस आर ए विकसकानेही त्याबाबत पालिकेत तक्रारी केल्याचे सांगितले. हजारोंच्या वर रहिवाशांना आजाराने घेरले असून शंभरपेक्षा जास्त रहिवासी विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. दूषित पाण्याच्या समस्येची व्याप्ती वाढल्याने स्थानिक नगरसेविका रुपाली रावराणे व माजी नगरसेवक व उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन डॉक्टरांचे एक पथक इमारतीत बोलावून रहिवाशांची तपासणी करून घेतली.
मृत्यू दूषित पाण्यामुळे ?
काही दिवसांपासून आजारी असलेल्या वेदांत हरेश जेठवा (वय 2) याचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. दूषित पाण्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला. दूषित पाणी प्यायल्यावर त्याला उलटी-जुलाबाचा त्रास झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, कुरार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जगदीश गावित वेदांतच्या शवविच्छेदन अहवालाच्या अधिक चौकशीसाठी रुग्णालयात गेले असल्याचे सांगण्यात आले. तेच रात्री उशिरा त्याबाबत अधिक माहिती देतील, असे सांगितले गेले.

No comments:
Post a Comment