मुंबईतील वाहतूक सिग्नल झाले डोळस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2015

मुंबईतील वाहतूक सिग्नल झाले डोळस

मोटारींची संख्या पाहून सिग्नलचा कालावधी बदलणार 
स्मार्ट सिग्नल लावणारी देशात मुंबई महापालिका पहिली
मुंबई / प्रतिनिधी
मुंबापुरी म्हणजे वाहनांच्या लांबलचक रांगा आिण चौकाचौकात रोड ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांची चाललेली लगबग. यावर आता मुंबई महापालिकेने नामी उतारा काढला असून शहरातील वर्दळीच्या चौकातील वाहतूक सिग्नलला वाहन शोधक कॅमेऱ्याची जोड दिली आहे. या स्मार्ट सिग्नल यंत्रणेमुळे मुंबईतील सिग्नलचा कालावधी ट्रॅफीकनुसार कमी, अिधक होणार असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी होऊन वायुप्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसणार आहे.

मुंबई शहरात एकुण ५९० सिग्नल आहेत. त्यातील वर्दळीच्या ठिकाणचे २५५ सिग्नल स्मार्ट पद्धतीचे करण्यात आले आहेत. म्हणजे या सिग्नलना वाहनशोधक कॅमेऱ्याची जोड दिली आहे. त्यामुळे त्या मार्गावरील ट्रफीक वाढताच येथील हिरवा सिग्नलचा कालावधी वाढेल तर ट्रफीक कमी होताच सिग्नलाचा कालावधीही आपोआप कमी होईल.

या सिग्नलला सीसीटीव्ही कॅमेरे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे सीसीटीव्हीव्दारे प्राप्त िचत्रण आणि तेथील संगणकीय माहितीनुसार सदर सिग्नल मानवीय पद्धतीने देखील िनयंत्रीत केले जाऊ शकणार आहेत. अशा प्रकारे स्मार्ट वाहतूक सिग्नलची मुहूर्तमेढ रोवणारी मुंबई देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

स्मार्ट वाहतूक सिग्नल पद्धतीचा िनयंत्रण कक्ष वरळीच्या पोलीस मुख्यालयात असून सॅटेलाईट माहिती नियंत्रण कक्ष महापालिकेच्या वरळी येथील अिभयंत्रिकी संकुलात लावण्यात आला आहे. शहरातील उर्वरित सर्व सिग्नलही लवकरच स्मार्ट करण्याचा िनर्णय महापालिकेने घेतला आहे.

१. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चौकातील प्राप्त िचत्र िदसणार असून रुग्णवाहिका िकंवा इतर आवश्यक कारणामुंळे त्या िठकाणच्या सिग्नलाचा कालावधी िनयंत्रण कक्षातून बदलणे शक्य होणार.
२. वाहन शोधक कॅमेरे असल्यामुळे  त्या मार्गावरील वाहन संख्येची नोंद होते. त्याचे संगणकीय पद्धतीने व संबंधित सॉफ्टवेअरच्या मदतीने िवश्लेषण केले जाते. आिण त्यानुसार वाहतूक सिग्नलचा कालावधी बदलतो.
३. मुंबईची सिग्नल यंत्रणा : पारंपरिक सिग्नल ३३५, सतत बंद-चालू होणारे १६६, स्मार्ट सिग्नल २५५, वाहन शोधक कॅमेरे ६८३, सीसीटीव्ही कॅमेरेयुक्त सिग्नल २४ आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad