१४ नोव्हेंबर रोजी मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई / प्रतिनिधी
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेब अध्ययन करत असताना ते ज्या मध्य लंडन मधील हेन्री रोडवरील घरात राहत होते त्या घराचे रूपांतरण मुझीयम मध्ये होणार आहे. त्याच्या लोकार्पण सोहळा १४ नोव्हेंबर रोजी होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले यांच्या हजेरीत होत आहे.
सदर इमारत तीन माजली असून पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर मुझीयम तर तिसऱ्या मजल्यावर निवासाची सोय करण्यात येणार आहे. मुझीयम मध्ये बाबासाहेबांची सर्व ग्रंथसंपदा येथे असेल. बाबासाहेब यांनी समतेसाठी देशात ज्या चळवळी केल्या, जी आंदोलने उभारली त्याची दृश स्वरुपात माहिती या मुझीयम मध्ये मिळणार आहे. बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा परिचय अभ्यागत यांना होण्यासाठी एक माहितीपट येथे दाखवला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितली.
हेन्री रोडवरील बाबासाहेब राहत होते ते घर लंडन च्या निवासी भागात आहे. त्यामुळे तेथे मोठा कार्यक्रम करता येत नाही, लाउड स्पीकर लावता येत नाही, त्यामुळे हा सोहळा छोटेखानी स्वरूपाचा असणार आहे, त्यामुळे अधिक लोकांना निमंत्रित केलेले नाही अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
माझी दिवाळी एकतर नागपूर किवा चंद्रपूर मधील मूल या माझ्या मूळ गावी साजरी करत आलो आहे, यंदा मात्र पहिल्यांदा मी मुंबईत वर्षा या शासकीय निवास स्थानी दिवाळी साजरी करत आहे. कारण मला पर्व लंडन ला निघायचे आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
बिहार निवडणुका चा निकाल पाहिल्यावर आता राज्यात आम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आहे असे नक्की वाटत असल्याचे सांगितले. तसेच लवकरच हा विस्तार होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ज्या दिवशी नितीशकुमार यांचा शपथविधी होईल त्या दिवशी त्यांना शुभेछा देणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या घराच्या तिसऱ्या मजल्यावर दर वर्षी लंडन मध्ये उच्च शिक्षणासाठी आलेल्या दोन विध्यार्थ्यांना येथे निवाससाठी प्रवेश दिला जाणार आहे, सध्या येथे मुझीयम व्यवस्थापक यांची राज्य शासनाने नेमणूक केली आहे. इतर स्टाफ लवकर भरला जाईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

No comments:
Post a Comment