३० नोव्हेंबर पर्यंत निरीक्षणे नोंदविण्याचे नागरिकांना आवाहन !
मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महापालिकेद्वारे तयार करण्यात आलेला प्रस्तावित 'प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४' याबाबत महापालिकेच्या संबंधित खात्याद्वारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात नामनिर्देशन सर्वेक्षण (Designation Survey) करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षण महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी त्यांची निरीक्षणे (Observations) ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत नोंदवावीत असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.
महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर (होमपेज वर) आपल्या डाव्याहाताला असणा-या उभ्या रकान्यात (कॉलम मध्ये) सर्वात खाली प्रस्तावित 'प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४' याबाबतची विविध माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत असणा-या पहिल्या 'लिंक' वर अर्थात 'प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४' यावर क्लिक केल्यानंतर जे पान उघडते त्यावरील ११ क्रमांकाच्या मुद्द्यांतर्गत 'Designation Survey २०३४' हि लिंक आहे. या 'लिंक' वर क्लिक केल्यानंतर मुंबई शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यानुसार ४ लिंक दिसतात. या नुसार प्रत्येक 'लिंक' वर क्लिक केल्यास महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची विभागनिहाय माहिती उपलब्ध आहे.
महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या नामनिर्देशन सर्वेक्षणासंबंधी माहिती 'पीडीएफ फाईल' मध्ये संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत नागरिकांची काही निरीक्षणे असल्यास त्यांनी ती येत्या ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत महापालिकेच्या विकास नियोजन या खात्यास कळवावयाची आहेत. सदर निरीक्षणे इ-मेल द्वारे ee.dpr.mcgm@gmail.comया इ-मेल पत्त्यावर कळवावयाची आहेत. हे कळविताना इ-मेल च्या 'subject' मध्ये किंवा पत्राने कळवावयाचे झाल्यास पाकीटावर "नामनिर्देशन सर्वेक्षण ऑक्टोबर २०१५" अथवा “Designation Survey October 2015" हे लिहिणे आवश्यक आहे.
निरीक्षणे पत्राने कळविण्यासाठी पत्ता:
प्रमुख अभियंता (विकास नियोजन)
५ वा मजला, नवीन विस्तारित इमारत,
बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय, महापालिका मार्ग,
फोर्ट, मुंबई - ४००००1
प्रमुख अभियंता (विकास नियोजन)
५ वा मजला, नवीन विस्तारित इमारत,
बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय, महापालिका मार्ग,
फोर्ट, मुंबई - ४००००1
No comments:
Post a Comment