‘रोहयो’च्या अपूर्ण धडक सिंचन विहिरींसह वर्ग व रद्द केलेल्या विहिरीही पूर्ण करण्याचा निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2015

‘रोहयो’च्या अपूर्ण धडक सिंचन विहिरींसह वर्ग व रद्द केलेल्या विहिरीही पूर्ण करण्याचा निर्णय

मुंबई- राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या धडक सिंचन विहीर योजनेतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग केलेल्या तसेच या योजनेतील रद्द केलेल्या विहिरी पुन्हा धडक सिंचन विहीर योजनेत समाविष्ट करुन पूर्ण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत या योजनेंतर्गत आतापर्यंत 35 हजार 985 विहिरी पूर्ण झाल्या असून एक हजार 534 विहिरी अपूर्ण आहेत. तसेच या योजनेतील रद्द करण्यात आलेल्या विहिरींपैकी पुन्हा सुरु करता येणाऱ्या 8 हजार 7 विहिरी धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत पुन्हा सुरु करण्यात येतील. अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी विभागाकडे 210 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून त्यातून 30 जून 2016 पर्यंत या सर्व विहिरी पूर्ण करण्यात येतील. 

धडक सिंचन विहीर योजनेतून नरेगात वर्ग केलेल्या अपूर्ण 10 हजार 320 विहिरी नरेगा अंतर्गत मोहीम स्वरुपात पूर्ण करण्यास व आवश्यकतेनुसार कुशल कामासाठी लागणारा अतिरिक्त निधी राज्य रोहयो निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या कामासाठी जादा मनुष्यबळ उपलब्ध करतानाच या अपूर्ण विहिरी 30 एप्रिल 2016 पर्यंत पूर्ण करण्यात येतील. या कालावधीत पूर्ण होऊ न शकणाऱ्या विहिरी 30 एप्रिलपासून धडक सिंचन विहीर योजनेमध्ये वर्ग करुन पूर्ण करण्यास व त्यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येईल

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad