दिवाळीच्या कालावधीत पाणी कपात मागे घेण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2015

दिवाळीच्या कालावधीत पाणी कपात मागे घेण्याची मागणी

मुंबई  ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात  यंदा आत्तापर्यंत झालेल्या कमी पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा कमी आहे त्यामुळे मुंबई समोर अद्याप पाणी संकट कायम असून सद्या मुंबईकरांवर 20 टक्के पाणी कपात लागू आहे मात्र लवकरच मोठा दिवाळी सन सुरू होणार आहे  या दिवाळीच्या काळात 10 ते 13 नोव्हेंबर कालावधीत गणपतीच्या धतीॅवर या चार दिवशी मुंबईकरांवर लागू केलेली 20 टक्के पाणी कपात मागे घ्या आणि मुंबईकरांना दिलासा दया अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे
 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणी साठा बराचसा कमी आहे पाऊस समाधानकारक पडला नाही त्यामुळे यंदा मुंबईसमोर गंभीर पाणी संकट उभे आहे त्यामुळे मुंबईकरांना वषॅभर पाणी पुरवठा व्हावा यासाठी.पालिकेने 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून शहरात 20 टक्के पाणीकपात लागू केली आहे. तर तरण तलाव, मॉल्स, तारांकित हॉटेल्स, बाटलीबंद पाण्याचे कारखाने, रेसकोर्स आदींच्या पाणीपुरवठय़ात 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली मात्र मुंबईकरांचा मोठा सन दिवाळी सुरू होत आहे हा सन मोठ्या प्रमाणात मुंबईकरांमध्ये सन साजरा केला जातो या सनाच्या काकालावधीत पाहुण्यांची वदॅळ मोठ्या प्रमाणात असते आणि पाणी मोठय़ा प्रमाणात लागत असते त्यामुळे गणपती सनाला पाणी कपात मागे घेवून मुंबईकरांना दिलासा दिला त्याच धर्तीवर आता सुरू होणाऱ्या दिवाळी सनाला 10 ते 13 नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत मुंबईकरांवर केलेली 20 टक्के पाणी कपात मागे घेवून मुंबईकरांना दिलासा द्यावा अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे येत्या र-थायी समितीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad