मुंबई : राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी ‘अटल सौर कृषी पंप योजना’ राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील 10 हजार सौर कृषी पंपाचे वाटप लवकरात लवकर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओ. पी. गुप्ता, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार मित्तल, अनुराधा पाटील आदी उपस्थित होते.
ऊर्जा विभागाचा सविस्तर आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, ‘अटल सौर कृषी पंप योजने’मधून 10 हजार सौर कृषी पंपांच्या वाटपाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाचे वाटप लवकरात लवकर करावे. ‘अटल सौर कृषी पंप योजना’ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सौर पंपांची उपयुक्तता शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रचार व प्रसार मोहीम राबवावी. राज्यातील एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी अद्याप मिळाली नाही. त्यामुळे या कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी विशेष मोहीम राबवून येत्या 31 मार्च 2016 पर्यंत सर्वांना जोडणी द्यावी.
विदर्भातील 3420 फिडरपैकी 1043 फिडरचे सेपरेशन (वाहिनी विलगीकरण) झाले आहे तर मराठवाड्यातील जवळपास सर्वच फिडरचे सेपरेशनचे काम पूर्ण होत आले आहे. राज्यातील उर्वरित ग्रामीण भागातील वीज वितरणासाठी फिडर सेपरेशन तातडीने पूर्ण करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

No comments:
Post a Comment