मुंबई / प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेवुन सर्वच पक्ष राजकारण करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या अनिहिलेशन ऑफ़ कास्ट हा ग्रंथ दोन वर्षापूर्वी मुद्रित करण्यात आला असला तरी हा ग्रंथ गोदामात धुळ खात पडला आहे. हा ग्रंथ तातडीने वाचकांना उपलब्ध करून न दिल्यास येत्या 15 दिवसात जातीय अंत संघर्ष समिती व पुरोगामी संघटना उग्र आंदोलन करतील असा इशारा समितीचे डॉ. एस.के. रेगे, सुबोध मोरे, शैलेन्द्र कांबले यांनी दिला आहे.
राज्यात दलितांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत. आरक्षण काढून घेण्याचे बोलले जात आहे. आरक्षण काढण्यात येवू नए म्हणून आणि खाजगी क्षेत्रात आरक्षण मिलायला हवे. राज्याचा अर्थसंकल्प बनवताना अनुसूचित जाती साठी आर्थिक तरतूद केली जाते. ही आर्थिक तरतूद इतर ठिकाणी वळवू नए इत्यादी मागण्यासाठी 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत जन जागृती आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती रेगे यांनी दिली. उस्मानाबाद मधील निशिकांत हुबे या दलित कार्यकर्त्याला हद्दपार करण्यात आले आहे. ही हद्दपारी रद्द करावी अशी मागणी सुबोध मोरे यांनी केली.
No comments:
Post a Comment