मुंबई / प्रतिनिधी
िशवसेना-भाजप युती सरकारचा लवकरच मंत्रीमंडळ िवस्तार करण्यात येईल आिण त्यामध्ये रामदास आठवले यांच्या िरपाइंला सामील करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी िदली. रिपाइं च्यावतीने चेंबुरमध्ये इंदु िमल स्मारकाच्या िवजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये फडणवीस बोलत होते.
मनमोहन सिंग यांच्या युपीए सरकारने इंदु िमलची जमीन बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जाहीर केली. मात्र जमीन हस्तांतरण करण्याबाबतच्या अडचणी दूर केल्या नाहीत. देण्याची नियत नसली की अशा अडचणी उभ्या केल्या जातात, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नाव न घेता केला.
स्मारकाच्या आराखड्याबाबत अनेक मतभेद आहेत, ते एकत्रीत बसून दूर करण्यात येतील. स्मारकात किरकोळ बदल करण्याची सरकारची तयारी यावेळी फडणवीस यांनी दर्शवली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकातील हिरवळीबाबत िदलेल्या सूचना कायम राहून बदल केले जातील अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी आंबेडकरी संघटनांना िदली.
िरपाइंला संधी
युतीच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे सांगत रामदास आठवले यांच्या पक्षाला लवकरच सत्तेत सहभागी करुन घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
--------
१. सामािजक न्याय िवभागाच्या वतीने अनुसूिचत जाती, जमातीच्या िवद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार पुढच्या तीन वर्षात ४५० कोटी रुपये खर्च करण्यात येतील.
२. राज्याच्या ग्रामीण भागातील अनुसूिचत जाती, जमातीच्या लोकांसाठी राज्य सरकार दरवर्षी २० हजार घरे बांधणार.
३.लंडनमधील ज्या घरात बाबासाहेब राहिले त्या स्मारकात दरवर्षी दोन भारतीय िवद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करणार.
----
११ आॅक्टोबर रोजी इंदु िमल उद्घघाटनावेळी आम्ही शरीराने हजर नसलो तरी मनाने उपस्थीत होतो असे धक्कादायक िवधान शवसेनेचे स्थािनक खासदार राहुल शेवाळे यांनी केले.
इंदु िमल स्मारकात न्युयार्क आयलँडच्या धर्तीवर बाबासाहेब आंबेडकर यांचा ३६० फुटाचा स्टॅच्यु आॅफ इक्वीटी पुतळा करावा, अशी मागणी यावेळी रिपाइं नेते अविनाश महातेकर यांनी केली.
काँग्रेसने दलित जनतेला केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवले, त्यामुळेच बाबासाहेबांना भारतरत्न िमळण्यास ४० वर्षे लागली असा आरोप यावेळी सामािजक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी यावेळी केला.
No comments:
Post a Comment