मुंबईतील आस्थापनांचे नोंदणीकरण नूतनीकरण आता ऑनलाईन शक्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2015

मुंबईतील आस्थापनांचे नोंदणीकरण नूतनीकरण आता ऑनलाईन शक्य


महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ अन्वये आस्थापनांचे नोंदणीकरण व नूतनीकरणात सुलभतातत्पर व किफायतशीर सेवा देण्याबाबत विविध प्रक्रिया व नियमात सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेतत्या अनुषंगानेबृहन्मुंबई महानगपालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यामार्फत आस्थापनांचे नोंदणीकरणात व नूतनीकरणात सुलभतातत्पर व किफायतशीर सेवा देण्याबाबत आस्थापनांचे नोंदणीकरण हे इंटरनेद्वारे ऑनलाईन व नूतनीकरण हे इंटरनेद्वारे ऑनलाईन/ मोबाईल ऍपद्वारे सुरु करण्यात आलेले आहे.

          
सदर सेवा ही नागरिकांना आस्थापना नियोक्त्यांना नोंदणीकरणाकरीता व नूतनीकरणाकरीता मुंबई अधिक्षेत्रातील विभागीय नागरी सुविधा केंद्रांमध्ये देखील सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेमुंबईकर नागरिक /आस्थापना नियोक्त्यांना आवाहन करण्यात येते कीमुंबई अधिक्षेत्रात आस्थापनांचे नोंदणीकरण हे इंटरनेद्वारे ऑनलाईन व नूतनीकरण हे इंटरनेद्वारे ऑनलाईनमोबाईल ऍपद्वारे सुरु झाल्यामुळे नागरिकांनीआस्थापना नियोक्त्यांनी नोंदणीकरण व नूतनीकरण हे सुलभतेने व तत्परतेने होण्याकरिता सदर सेवेचा लाभ घ्यावासदर सेवा इंटरनेद्वारे ऑनलाईन करण्याकरीताwww.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर आणि मोबाईल ऍपद्वारे करण्याकरीता www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन MCGM 24 x 7 वर उपलब्ध करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad