महापालिकेच्या रुग्णालयांमधून १५ कोटींपेक्षा अधिक रकमेची मदत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2015

महापालिकेच्या रुग्णालयांमधून १५ कोटींपेक्षा अधिक रकमेची मदत

सात महिन्यात ११,६४१ गरीब रुग्णांना दिलासा !
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर माफक दरात उपचार केले जात असतातमात्र अनेक रुग्णांची तेवढी आर्थिक कुवत नसतेअशा रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये असणा-या `गरीब रुग्ण सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोयावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर २०१५ दरम्यान `गरीब रुग्ण सहाय्यता निधी' (Poor Box Charitable Fund) म्हणजेच `PBCF' मधून एकूण १५ कोटी ६५ लाख ७२ हजार ८१९ रुपयांची रुपयांची आर्थिक मदत देऊन ११,६४१ गरीब रुग्णांना दिलासा देण्यात आला आहे.

शस्त्रक्रिया
औषधोपचार यासारख्या विविध बाबींसाठी आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील गरुजुंना दिलासा मिळावाया प्रमुख उद्देशाने सन १९२६ पासून महापालिकेच्या रुग्णालयांमधून `गरीब रुग्ण सहाय्यता निधीची सुरूवात करण्यात आली आहेया निधी मध्ये समाजातील विविध घटकातील लोक तसेच संस्थाकंपन्या त्यांचे आर्थिक योगदान देत असतातराज्य सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये ज्या प्रकारचे वैद्यकीय उपचार संलग्न नाहीततसेच कोणत्याही सेवाभावी संस्थेकडून वित्तीय सहाय्य मिळणे शक्य नसतेअशा परिस्थितीत वैद्यकीय उपचार अथवा शस्त्रक्रिया इत्यादी करीता रुग्णालयाच्या`गरीब रुग्ण सहाय्यता निधीमधून गरजूंना अर्थसहाय्य देण्यात येते.


एप्रिल ते ऑक्टोबर २०१५ दरम्यान महापालिकेच्या रा..स्मा. (के..एम.)रुग्णालयातील `PBCF' मधून ३७१२ रुग्णांना सुमारे १० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहेतर बानायर रुग्णालयातील `PBCF' मधून एकूण ६,३३९ रुग्णांना सुमारे ४ कोटी ६४ लाख अर्थसहाय्य देण्यात आले आहेसंबंधित गरजु व्यक्तींनाच या निधी मधून अर्थसहाय्य मिळावेयासाठी अर्जदार रुग्णाने वा त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयातील`वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता' (Medical Social Worker) किंवा संबंधित `सहाय्यक वैद्यकीय अधिकारी' (Asst. Medical Oficer) यांच्याकडे संपर्क साधणे आवश्यक असते.

सदर अर्ज प्राप्त झाल्यावर `वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ताकिंवा संबंधित `सहाय्यक वैद्यकीय अधिकारीनियमांच्या अधीन राहून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची छाननी करतातसदर रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीची खातरजमा झाल्यानंतर व इतर कोणत्याही योजनेमधून किंवा सेवाभावी संस्थांद्वारे सदर रुग्णास मदत मिळू शकत नाहीयाची खातरजमा झाल्यावर सदर रुग्णास `PBCF' मधून अर्थसहाय्य देण्यात येते.

महापालिकेच्या रुग्णालयातील `गरीब रुग्ण सहाय्यता निधीमधून समाजातील अत्यंत गरजुंना वैद्यकीय बाबींसाठी अर्थसहाय्य दिले जातेया निधी मध्ये देण्यात येणा-या योगदानासाठी संबंधित दात्याला आयकर अधिनियम `८० जीअंतर्गत विविध तरतुदींनुसार आयकर सूट देखील मिळू शकते. `गरीब रुग्ण सहाय्यता निधीकरिता देणगी द्यावयाची झाल्यास संबंधित रुग्णालयातील `वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ताकिंवा अधिष्ठाता किंवा वैद्यकीय अधिक्षक (Medical Superintendent) देणगी रकमेचा धनादेश `अधिष्ठातागरीब रुग्ण सहाय्यता निधी' (Dean, PBCF) यासह संबंधित रुग्णालयाचे नाव लिहून देता येऊ शकतो. (उदाहरणार्थ: Dean, PBCF, LTMG Hospital.)

रुग्णालयातून १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०१५ दरम्यान देण्यात आलेल्या अर्थसहाय्याची आकडेवारी:

           

.क्र.
रुग्णालयाचे नाव
अर्थसहाय्य रक्कम (रुपये)
लाभार्थींची संख्या
1
रा..स्मा. (के..एम.) रुग्णालय
99971741
3712
2
बानायर रुग्णालय
46476335
6339
3
लोकमान्य टिळक सर्वरुग्णालय
7519262
430
4
वांद्रे भाभा रुग्णालय
742816
194
5
भगवती रुग्णालय
452411
167
6
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय
231030
135
7
राजावाडी रुग्णालय
565263
276
8
महापालिकेची इतर रुग्णालये
613961
388

एकूण
156572819
11641

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad