धारावी परिसरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2015

धारावी परिसरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार

मुंबई ( प्रतिनिधी ) - उध्वॅ वैतरणा जलवाहिनीवर सहार अँकर ब्लाॅक ते र-काडा केबिन वांद्रे दरम्यान चार ठिकाणी जोड करण्याचे काम पालिका हाती घेणार आहे त्यामुळे या कामामुळे 4 ते 5 नोव्हेंबर दरम्यान जी / दक्षिण व जी / उत्तर विभागात पाणी पुरवठ्यावर परिणाम तर धारावी परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती पालिका जलविभागातून देण्यात आली आहे त्यामुळे या कालावधीत येथील लोकांना पाणी जपून आणि पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे

उध्वॅ वैतरणा जलवाहिनीवर सहार अँकर ब्लाॅक ते र-काडा केबिन वांद्रे दरम्यान चार ठिकाणी जोड करण्याचे काम पालिका हाती घेणार आहे हे काम चार नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू करणार आहे ते पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत पूर्ण करणार आहे या कालावधीत जी / उत्तर विभागातील धारावी परिसरात पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद राहणार आहे तसेच संत रोहिदास चौक , सेनापती बापट मार्ग येथील अरि-तत्वात असलेल्या 600 मिली मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर 600 मिली मीटर व्यासाची झडप बसविण्याचे व 1450 मिली मीटर तानसा पूर्व  व 600 मिली मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे छेद जोडकाम हाती घेण्यात येणार आहे सदर काम चार नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता सुरू होऊन ते पाच नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे या कालावधीत जी / उत्तर व जी / दक्षिण विभागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad