काळबादेवी आगीत मृत्युमुखी पडलेल्याना अभियांत्याना आर्थिक मदत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2015

काळबादेवी आगीत मृत्युमुखी पडलेल्याना अभियांत्याना आर्थिक मदत


मुंबई / प्रतिनिधी
काळबादेवी येथील आगीमधे मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलातील चार अधिकार्याना बृहनमुंबई महानगरपालिका अभियंता संयुक्त कृति समितिच्या वतीने प्रत्तेकी 2 लाख 61 हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली.


काळबादेवी येथील आगीमधे अग्निशमन दलाचे प्रमुख नेसरिकर, उप प्रमुख अमिन तसेच राणे व देसाई हे दोन कर्मचारी असे एकुण 4 जण मृत्युमुखी पडले. अभियंता कृती समितीच्यावतीने अभियंत्याकडून प्रत्तेकी 500 रुपये तर वरिष्ठ अभियंत्या कडून प्रत्तेकी 1 हजार रुपये पगारतुन कापून घेण्यात आले होते. हे जमा केलेले पैसे पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते जयश्री नेसरिकर, शर्मिला अमिन, मेधा राणे, मानसी देसाई याना प्रत्तेकी 2 लाख 61 हजार रूपये देण्यात आले. यावेळी सुखदेव काशिद, आणि साईंनाथ राज्याध्यक्ष उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad