शिवसेनेच्या मरीन ड्राई व्ह येथील ओपन जिमवर पालिका कारवाई करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2015

शिवसेनेच्या मरीन ड्राई व्ह येथील ओपन जिमवर पालिका कारवाई करणार

मुंबई - मरिन ड्राईव्हवर हेरीटेजच्या जागेत शिवसेनेच्या पुढाकाराने उभारलेली ओपन जिम हटवण्याचा निर्णय न्यायालयाकडून नियुक्त केलेल्या महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या त्रिसदस्यीय समितीने घेतला आहे. या समितीने ही जिम ठराविक मुदतीत हटवावी अन्यथा महापालिका स्वतः कारवाईकरेल असा इशारा समितीने दिला आहे. 

महापालिका आयुक्तांनी सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली आपले अधिकार वापरत हेरीटेजच्या जागेत ओपन जिमला परवानगी दिली होती. आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमान संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पुरातन वास्तू समितीचे अध्यक्ष असलेल्या त्रिदस्यीय समितीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

आयुक्तांनी दिलेल्या परवानगीप्रमाणे तीन महिन्यांची मुदत १६ ऑक्टोबरला संपली होती. त्यामुळे ही मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त जावेद अहमद व पुरातन वास्तू समितीचे अध्यक्ष रमानाथ झा यांची बैठक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पार पडली. या बैठकीनंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या बैठकीचा इतिवृत्तांत बनवून झाल्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल, असे म्हटले होते. या इतिवृत्तांतावर शेवटचा हात फिरवला जात आहे. ज्यामुळे या समितीने ओपन जिम मरिन ड्राईव्हवर नसावे,असे स्पष्ट म्हटले आहे.

मरिन ड्राईव्ह जागतिक पुरातन वास्तूत मोडतो. ओपन जिमचा वापर लोकांकडून चांगल्या प्रकारे केला जात आहे; पण त्यासाठी ही जागा योग्य नाही, असे नमूद करून संबंधित संस्थेने याच विभागातील उद्यान अथवा मैदानात पर्यायी जागेचा शोध घ्यावा. या संस्थेला ठरावीक कालावधी निश्चित करून जिम पर्यायी जागेत हलवण्यास संधी द्यावी. परंतु त्यांनी या कालावधीत जिम न हटवल्यास, महापालिकेच्या वतीने ती हटवली जावी, असे या समितीने म्हटल्याचे समजते.


दरम्यान मरिन ड्राईव्ह येथे शिवसेनेकडून तयार करण्यात आलेली ओपन जिम महानगरपालिका हटविणार असल्यामुळे हा वाद वाढू लागला आहे. ही जिम नागरिकांच्या हितासाठी तयार करण्यात आली असून, यावर राजकारण होणे चुकीचे असल्याचे शिवासेना नेते अनिल देसाई यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad