मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा गौरव करणारे संकेतस्थळ सुरू करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकाला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आली.
नथुराम गोडसेंचे महत्त्व वाढवण्यासाठी त्यांच्या नावे संकेतस्थळ सुरू करणाऱ्यांवर भारतीय दंडसंहिता कलम १२१ (देशाविरुद्ध युद्ध छेडणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
याचिकेनुसार, अशा प्रकारचे संकेतस्थळ सुरू करून संबंधितांनी देशाविरुद्ध युद्ध छेडले आहे. menathuramgodase.com या संकेतस्थळाच्या कॉन्टॅक्ट पानावर पुण्याच्या शिवाजी नगरचा पत्ता दिसून येतो. हे संकेतस्थळ एका नाना गोडसे नावाच्या व्यक्तीने सुरू केले आहे. या संबंधीची तक्रार मुंबई आणि पुणे पोलिसांना ई-मेलद्वारे केली आहे. मात्र, अद्याप कारवाई केलेली नाही. या याचिकेवरील सुनावणी लवकरच उच्च न्यायालयात होईल.
No comments:
Post a Comment