'शहीद भगतसिंहांची जेल डायरी' आता मराठीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2015

'शहीद भगतसिंहांची जेल डायरी' आता मराठीत





ब्रिटीश असेम्ब्लीमध्ये बॉम्ब टाकल्याप्रकरणी ८ एप्रिल १९२९ रोजी भगत सिंहांना अटक करण्यात आली. जवळपास अडीच वर्षे ते लाहोरच्या तुरुंगात होते. या काळात त्यांनी प्रचंड ज्ञानसाधना केली. जगभरातील क्रांतिकारकांचा, चळवळींचा, विचारवंतांचा, समाजवादाचा - साम्राज्यवादाचा अभ्यास केला आणि या सर्वांचा संदर्भ घेवून भगतसिंहांनी 'जेल डायरी' लिहिली. मात्र, भगतसिंहांच्या मूळ इंग्रजी हस्ताक्षरात असणारी ही डायरी मराठी वाचकांपर्यंत पोहोचणे केवळ दुरास्तवच होते. पण, इतिहासाचे अभ्यासक असणारे अभिजीत भालेराव यांनी २ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी या डायरीचा मराठी अनुवाद केला आहे. 'जीवनरंग'तर्फे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे भगतसिंहांच्या मूळ हस्ताक्षरासहीत ही डायरी वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. मराठीत 'बुक ट्रेलर'चा प्रयोग "जेल डायरी"च्या प्रकाशनानिमित्त डायरीचा यूथफूल 'ट्रेलर' रिलीज़ करण्यात आला आहे. मराठी पुस्तकविश्वात पहिल्यांदाच असा 'बुक ट्रेलर' चा प्रयोग करण्यात आला असून ही डायरी तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अनुवादक अभिजीत भालेराव यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad