- सांस्कृतिक दादागिरी, वाढती असहिष्णुता आणि एफटीआयआयमधील दडपशाहीचा केला िनषेध
- कुंदन शहा, सईद मिर्झा, िवरेंद्र सैनी, मधुश्री दत्ता यांचा त्यामध्ये आहे समावेश
मुंबईि / प्रतिनिधी
लेखक, िदग्दर्शक, इतिहासकार, कलाकार यांच्याकडून देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या िवरोधात पुरसकार परत करण्याचे सत्र कायम असताना बॉलीवूडमधील कुंदन शहा, सईद मिर्झा, िवरेंद्र सैनी अशा जानेमाने २४ हस्तींनी गुरुवारी पुरस्कार परतीची घोषणा करत मोदी सरकारला पुन्हा जोर का झटका िदला.
बॉलीवूडमधील कलाकारांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली त्यात पुरस्कार परतीची घोषणा केली. त्यामध्ये जाने भी दे यारो िचत्रपटाचे िदग्दर्शक कुंदन शहा, एफटीआयआयचे माजी चेअरमन सईद िमर्झा, एफटीआयआयचे माजी अिधष्ठाता िवरेंद्र सैनी, मधुश्री दत्ता, संजय काक, तपन बोस, तरुण भारतीय, अजय रैना, मंजु लोबो, रफी इलिएस, अमिताभ चक्रवर्ती अशा २४ नामवंत िदग्दर्शक, संकलक, कॅमेरामन अशा हस्तींचा समावेश आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून शैक्षणीक संस्थांमध्ये अधिक हस्तक्षेप होतो आहे, जसा पुण्यातील िफल्म अँड टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट आणि चेन्नईच्या आयआयटीमध्ये झाला. लेखकांवर हल्ले होत आहेत, खरे बोलायची िभती वाटू लागली आहे, िवद्यार्थ्यांचे संप मोडण्यासाठी पोलीसीबळाचा वापर होतो आहे. हा सर्व प्रकार असहिष्णुतेच्या पलीकडे गेल्यामुळे आम्ही पुरस्कार परत करुन िनषेध करत आहोत, असे या कलावंतांनी सांगितले.
पुरस्कार परत करणे राजकीय चाल असल्याचे अनुपम खेर आिण शाम बेनेगल म्हणतात. आम्हाला मात्र पुरस्कार वापसी निषेधाचे हत्यार वाटते असे स्पष्ट करत देशातील पुढचा काळच कोण बरोबर, कोण चूक हे ठरवेल असे भाकीत कुंदन शहा यांनी व्यक्त केले. भारतीय संविधानाच्या िवरोधात मोदी राजवटीमध्ये अनेक गोष्टी होत आहेत, असा आरोप िदग्दर्शक सईद मिर्झा यांनी केला.
पुण्याच्या एफटीआयआयमधील आंदोलन हातळण्यात मोदी सरकारची गंभीर चूक झाली. िवद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतरही त्यांना सुविधा िदल्या जात नाहीत. िवद्यार्थ्यांना पोलीसांकरवी त्रास िदला जात आहे. त्यामुळे एफटीआयआयमधला स्ट्राईक संपला तरी फाईट कायम राहणार असल्याचे एफटीआयआयचे माजी अिधष्ठाता विरेंद्र रैनी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment