विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2015

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र


मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, जनता दल आणि जनता दल युनायटेड या महाआघाडीला मोठे यश मिळाल्याचे पडसाद राज्यात उमटले असून; राज्यात लवकरच होणा-या विधान परिषदेच्या आठ जागांच्या निवडणुकीत भाजपाला बिहारप्रमाणेच धूळ चारण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी यासाठीचे संकेत दिले. यासाठी जानेवारी महिन्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या आठ जागांसाठी होणा-या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत प्राथमिक चर्चा झाली असल्याचेही पवार यांनी सांगितले.
बिहारच्या निवडणुकांतील परिणामांवर समीक्षा करण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. केंद्रातील मोदी सरकारची प्रतिमा आणि लोकप्रियता वेगाने घटली असून; त्यांना बिहारच्या जनतेनेही नाकारले. या पार्श्वभूमीवर राज्यात विरोधी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत सोमवारी राष्ट्रवादी नेत्यांच्या झालेल्या बैठकीत पवार यांनी व्यक्त केले.
पुढील वर्षात राज्य विधान परिषदेच्या ३० सदस्यांचा कार्यकाळ संपत असून; त्यातील ८ जागांसाठी जानेवारी २०१६ मध्ये निवडणुका होणार आहेत. या रिक्त जागांपैकी सर्वाधिक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपाच्या नेतृत्वात असलेल्या सरकारचा मुकाबला करण्यासाठी राज्यात काँग्रेससह समान विचारधारा असलेले पक्ष एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यासाठी जानेवारी महिन्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या आठ जागांसाठी होणा-या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. पुढील वर्षात विधान परिषदेच्या ३० जागांवरही निवडणुका होणार असून; काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढलो तर सर्वाधिक जागांवर विजय मिळवता येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad