मुंबई - यापूर्वी रेल्वेची तक्रार नोंदवही मराठीत असावी याबाबतच्या सुचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांनी केल्या होत्या. त्यानंतर मध्य रेल्वेचे मुख्य कमर्शियल व्यवस्थापक आर. डी. शर्मा यांनी मराठी तक्रार नोंदवही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५०० तक्रार नोंदवह्या तयार करण्यात आल्या असून राज्यभरातील स्थानकांवर त्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येत्या काळात ही संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
दरम्यान, वाढत्या तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन तक्रारींचे प्रमाणही वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. महिन्याला येणा-या तक्रारींमध्ये ५०० ऑनलाईन तक्रारी येत असून ३०० पांरपरिक तक्रारी व सूचना येतात. यामध्ये २२० तक्रारी आणि ८० सूचनांचा सामावेश असतो.
शिवाय मध्य रेल्वेच्या सीओएमएस(कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टीम)च्या आधारे तक्रारी नोंदवण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मध्य रेल्वेकडून तक्रारींसाठी एसएमएसचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला असून ९७१७६३०९८२ हा नंबर देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment