वाहतूक पोलिसांचे ‘कॉल सेंटर’ ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2015

वाहतूक पोलिसांचे ‘कॉल सेंटर’ !

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई वाहतूक पोलिसांनी कॉल सेंटर सुरू केले आहे. दूरध्वनी, व्हॉट्स अ‍ॅप, ईमेल, एसएमएस वा अ‍ॅपद्वारे तक्रारीची नोंद वाहतूक पोलिस घेणार आहेत. बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याच्या उपस्थितीत कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले. संपूर्णपणे एकाच विभागाला वाहिलेली ही यंत्रणा देशात पहिल्यांदाच मुंबई पोलिसांनी तयार केली आहे.

आयुक्त अहमद जावेद आणि वाहतूक विभागाचे सहआयुक्त मिलिंद भारांबे यांच्या संकल्पनेतून ही यंत्रणा उभी राहिली आहे. सुरुवातीला वाहतूक पोलिसांचा अंतर्भाव असलेले दहा कर्मचारी ही यंत्रणा हाताळणार आहेत. वाहतूक पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल, असे भारांबे म्हणाले. संपूर्णपणे वाहतूक पोलिसांकडून हे कॉल सेंटर चालविण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले.
कॉल सेंटर क्रमांक : ८४५४९९९९९९
वाहतुकीसंदर्भात कुठल्याही तक्रारींची नोंद आता नागरिकांना या कॉल सेंटरवर नोंदविता येणार आहेत. वाहतूक कोंडी वा अपघाताबाबत मिळालेल्या माहितीची नोंद करून त्याची माहिती घेणे तसेच नो पार्किंग विभागातील गाडी वाहतूक पोलिसांनी उचलून नेल्यास ती कुठे आढळेल वा चुकीच्या पद्धतीने गाडी उचलून नेली तरी त्याची तक्रार नोंद करण्याची सोय उपलब्ध आहे. वाहतूक विभागातील विविध अधिकाऱ्यांची माहितीही या कॉल सेंटरवरून मिळू शकणार आहे. या व्यतिरिक्त पे अँड पार्क कुठे उपलब्ध आहे, बेस्ट, रेल्वे, मेट्रो, टॅक्सी, ऑटो तसेच इतर पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबत माहितीही पुरविली जाणार आहे. रस्त्यावर खोदकाम सुरू असल्यास वा एखादा मोर्चा, धार्मिक मिरवणूक, कार्यक्रमाची आगाऊ माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच पर्यायी रस्त्यांची माहितीही असेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad