मुंबई : भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत १४ थीमवर आधारित विविध प्रश्नावर गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर चर्चा करून ऑनलाईन अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य शासनास दिले आहेत.
यानुसार कार्यवाही करण्यात येत असून राज्यस्तरावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, सीएसआर आदी १४ थीमवर आधारित ७३ प्रश्नावर सखोल चर्चा केली आहे. तसेच शासनानेही प्रत्येक थीमबाबत विचार मांडले आहेत.
सदर थीमबाबतचा अहवाल शालेय शिक्षण विभागाच्या https://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. याबाबत समाजातील सर्व घटकाकडून वरील संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या अहवालाबाबत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सूचना, अभिप्राय, शिफारसी schoolennep@gmail.com या इमेलवर २३ नोव्हेंबर २०१५ पर्यंत इंग्रजी भाषेमध्ये पाठविण्यात याव्यात. या संधीचा जास्तीत जास्त व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment