मुंबई - मुंबईकरांचा रोजचा प्रवास आणि धावपळीचं जीवन म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यात त्यांची लोकल ट्रेन किंवा बस चुकली की दिवसाचं सारं वेळापत्रक विसकटून जाते. पण आता मुंबईकरांसाठी अजून एक खुशखबर आहे. त्यांच्या या काट्यावरच्या वेळापत्रकासाठी मुंबईकरांना बेस्ट बसची वेळ कळणार आहे.
लवकरच बेस्टच्या सर्व बसमध्ये लाइव्ह ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ही सिस्टिम बसवण्याची योजना आहे. पण अजून काही काळ तरी त्यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. बस कधी येईल याचा अंदाज सध्या तरी करता येत नाही. वाहतूककोंडी, बसमधील बिघाड आदी विविध प्रकारांमुळे प्रवाशांना अनेकदा तिष्ठत बसण्याची वेळ येते व काहीवेळा बस येणार असली तरी न कळल्यामुळे आधी बराचकाळ प्रतीक्षा करणारे प्रवासी टॅक्सी वा अन्य वाहनांचा वापर करत. मात्र आता या नव्या पद्धतीमुळे बसची प्रतीक्षाही अजून किती काळ करावी लागेल, ते समजू शकणार आहे. त्यासाठी ही सिस्टिम मोबाइल अॅपशी संलग्नही केली जाईल. बस थांब्यावरही इंडिकेटर्स लावले जातील, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये निवड करण्यात आलेल्या १०० शहरांमध्ये मुंबर्इचाही समावेश आहे. या योजनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यात येणार आहे. सिस्टिमद्वारे माहिती नियंत्रण कक्षातून या अॅपला माहिती देण्यात येणार असून बस सध्या कुठे आहे, याची माहिती थांब्यावरील प्रवाशांना समजणार आहे.

No comments:
Post a Comment