मुस्लीम,ख्रिश्चनांची बाॅर्डरवर वाढ धोक्याची - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2015

मुस्लीम,ख्रिश्चनांची बाॅर्डरवर वाढ धोक्याची

- बाॅर्डरवरच्या लोकसंख्यावाढीच्या असमतोलाचा आढवा घेतला जावा  
- राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर
मुंबई /  प्रतिनिधी
बांगलादेशाच्या िसमावर्ती भागात अासम, िबहार, पश्चिम बंगाल आिण चीनच्या सिमेवरील अरुणाचल प्रदेश, मणिपूर राज्यांमध्ये मुस्लीम आिण ख्रिश्चन धर्मियांची मागच्या दशकात मोठी लोकसंख्यावाढ झाली असून त्यामुळे भारताच्या एकात्मतेला धोका पोचू शकतो असा इशारा मोदी सरकारला देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकसंख्यावाढीच्या असमतोलाचा आढावा घेतला जावा, असा ठराव नुकताच मंजूर केला आहे.
हरियाणातील रांची शहरात ३० आॅक्टोंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये सिमतावर्ती भागातील लोकसंख्यावाढीच्या असमतोलािवषयी चर्चा झाली. तसेच लोकसंख्येच्या असमतोलाचा ठराव मंजूर करण्यात आला, अशी माहिती संघाचे कोंकण प्रांत संघचालक प्रा. सतीश मोढ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत िदली.

अासम, पश्चिम बंगाल आिण िबहार या राज्यांमध्ये १९५१ मध्ये हिंदु धर्मीयांची लोकसंख्या ८८ टक्के होती. २०११ मध्ये ती ८३.८ टक्क्यांवर आली. मात्र याच काळात मुस्लीम धर्मियांची लोकसंख्या ९.८ टक्केवरुन १४.२३ टक्केवर गेली. अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यात १९५१ मध्ये िहंदु ९९.२१ टक्के होते, २०११ मध्ये ते ६७ टक्क्यांवर आले. मात्र याच राज्यात एका दशकात िख्रश्चनांची १३ टक्क्यांनी लोकसंख्या वाढली. मणिपूरमध्ये १९५१ मध्ये हिंदु ८१ टक्के होते, २००१ मध्ये त्यांची लोकसंख्या ५० टक्क्यांवर आली आहे, असा संघाचा दावा आहे.
  
ईशान्येकडील राज्यात हिंदुंचे धर्मांतर होत आहे, त्यामुळे तेथे हिंदुची लोकसंख्या सतत घटत चालली आहे. पश्चिम बंगाल, िबहारात बांगला देशातून मुस्लीम स्थलांतर होत अाहे, त्यामुळे तेथे मुस्लीमांची लोकसंख्या वाढत चालली अाहे, असा दावा मोढ यांनी केला. बांगलादेशी स्थलांतरांना भारतात येू देण्यास हरकत नाही, मात्र त्यांना आपल्या देशाचे नागरिकत्व मात्र देऊ नये, असे संघाचे मत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
----
हाप की फूल?
पाच वर्षापूर्वी स्वयंसेवकाच्या गणवेश बदलाबाबत चर्चा झाली होती. मात्र पाच वर्षंानी त्यावर िवचार व्हावा, असा िनर्णय तेव्हा झाला होता. ५ वर्षांचा कालावधी सरल्याने रांचीच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. गणेश बदलाबाबत एक समिती नेमण्यात आली आहे. समिती सर्वांची मते आजमावून २०१६ मध्ये राजस्थानातील नागौर येथे होणाऱ्या अिधवेशनात अहवाल मांडणार आहे. त्यानंतरच स्वयंसेवकांची च्हाप चड्डी, की फुल पँटज् याचा िनर्णय होईल, अशी माहिती प्रा. सतीश मोढ यांनी िदली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad