मुंबई - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या लंडनस्थित घराचे स्मारकात औपचारिक लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तीन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर जात आहेत. या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही न दिल्यामुळे विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.
ब्रिटिश दूतावास आयोजित हा कार्यक्रम ‘छोटा’ असल्याने निमंत्रितही मर्यादित आहेत. हा निवासी परिसर असल्यामुळे तेथे लाउडस्पीकर वा फटाकेही फोडले जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. हे घर डाॅ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित केले जाईल.घरात शोधनिबंधांसह बाबासाहेबांची ग्रंथसंपदा व जीवनचरित्र ठेवले जाईल. दोन विद्यार्थ्याना शिष्यवृत्तीद्वारे तिसऱ्या मजल्यावर वास्तव्याची संधी मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. सरकारने अशा मुद्द्यांचे राजकारण करणे थांबवावे, असे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
कोणतेही निर्बंध नसताना इंदू मिलवरील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनालाही आम्हाला निमंत्रित न करणाऱ्या आरएसएस विचारसरणीच्या राजकीय नेत्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय नेत्यांशी संबंधित मुद्द्यांचे तरी राजकारण करणे त्यांनी थांबवावे. असे कार्यक्रम घेण्याअगोदर त्यांनी आंबेडकर समजून घ्यावेत, असेही सावंत म्हणाले.
राजकीय स्वार्थ साधण्याचा भाजपचा इरादा समजून घेण्याइतपत आंबेडकरी जनता हुशार आहे. सरकारने राजकारण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आंबेडकरी जनता भुलणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी म्हटले आहे. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी काम केलेल्या ज्येष्ठांना, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत, निमंत्रित करायला हवे होते, असेही ते म्हणाले. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्र सरकारने ३१ कोटी रुपयांत लंडनमधील १०, किंग्ज हेनरी रोडवरील घर विकत घेतले. या घरात बाबासाहेबांनी १९२१-२२ मध्ये वास्तव्य केले होते. २०५० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या घराचा सप्टेंबरमध्ये सरकारला ताबा मिळाला.

No comments:
Post a Comment