मुंबई महापालिकेकडून २५९६ उपहारगृहांची तपासणी - १९३६ अनधिकृत सिलेंडर्स जप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2015

मुंबई महापालिकेकडून २५९६ उपहारगृहांची तपासणी - १९३६ अनधिकृत सिलेंडर्स जप्त


मुंबई / प्रतिनिधी - महापालिकेद्वारे दि१९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेल्या उपहारगृहांच्या तपासणीमध्ये आजपर्यंत २५९६ उपहारगृहांची तपासणी करण्यात आली आहेया तपासणी दरम्यान १,९३६ अनधिकृत सिलेंडर्स महापालिकेच्या विशेष चमूद्वारे जप्त करण्यात आले आहेततर २,१३३ उपहारगृहांबाबत महापालिकेच्या नियम व पध्दतींनुसार यथोचित कार्यवाही करण्यात येत आहे.


दि१६ ऑक्टोबर २०१५ रोजी कुर्ला परिसरातील एका उपहारगृहात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर महापालिका क्षेत्रातील सर्व उपहारगृहांची तपासणी महापालिकेद्वारे करण्यात येत आहेया तपासणीसाठी व योग्य त्या कारवाईसाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागात प्रत्येक विभागस्तरावर एका विशेष चमूचे गठन करण्यात आले होतेसदर चमूद्वारे सर्व विभागांमध्ये उपहारगृहांच्या तपासण्या करण्यात येत आहेत.

महापालिका क्षेत्रातील अनेक उपहारगृहांमध्ये त्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक सिलेंडर्स अनधिकृतरित्या ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहेहे सर्व अनधिकृत सिलेंडर्स महापालिकेद्वारे जप्त करण्यात आले आहेततसेच उपहारगृहांमध्ये आढळून आलेले अनधिकृत बांधकामअनधिकृत शेड इत्यादी हटविण्यात आले असून अग्निसुरक्षा विषयक बाबींची देखील तपासणी करण्यात येत आहे.याबाबत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार महापालिकेच्या आर दक्षिण विभागात सर्वाधिक म्हणजे १५० उपहारगृहांबाबत महापालिकेच्या नियम व पध्दतीनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.तर सर्वाधिक म्हणजे १८७ सिलेंडर्स हे पी/उत्तर विभागाच्या परिसरातून जप्त करण्यात आले आहेत.

ज्या उपहारगृहातील अग्निसुरक्षा परिपूर्ण असेल त्या सर्व उपहारगृहांच्या प्रवेशद्वारांवर ''हा परिसर अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे'' (THIS RESTAURANT IS FIRE SAFETY COMPLIANT) असा संदेश असलेला व किमान ७५ मीमी पेक्षा अधिक आकाराच्या अक्षरात असलेला फलक ठळकपणे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेतत्याचबरोबर नागरिकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उपहारगृहात जातांना अग्निसुरक्षा विषयक फलक असलेल्या उपहारगृहाला भेट द्यावीअसे आवाहन अग्निशमन दलाद्वारे करण्यात आले आहे.

महापालिकाक्षेत्रातील प्रत्येक उपहारगृहातील आकारमानानुसार व संबंधित बाबींच्या सापेक्ष त्या उपहारगृहात किती 'गॅस सिलेंडरअसावेत व कशाप्रकारे ठेवले जावेततसेच उपहारगृहामध्ये परिपूर्ण अग्निसुरक्षा कशी असावीयाबाबत जारी करण्यात आलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत असून सर्व संबंधितांनी सदर मार्गदर्शक सूचनांचे परिपूर्णपणे पालन करावेअसेही आवाहन मुंबई अग्निशमन दलाद्वारे करण्यात आले आहे.

विभागनिहाय आकडेवारी :

अनुक्र.
परिमंडळ
विभाग
उपहारगृहांची केलेली तपासणी
कार्यवाही कारवाई केलेल्या उपहारगृहांची संख्या
कार्यवाही  सुरु केल्यापासून
जप्त केलेल्या सिलेंडर्सची संख्या
1
एक

105

77
39
2
एक

बी
94

79
63
3
एक
सी
110

70
32
4
एक
डी
131

65
60
5
एक
142

132
124
6
दोन
एफ /दक्षिण
90

90
78
7
दोन
एफ /उत्तर
64

43
51
8
दोन
जी /दक्षिण
122

75
84
9
दोन
जी /उत्तर
148

148
54
10
तीन
एच पूर्व
83

50
87
11
तीन
एच /पश्चिम
145

110
24
12
तीन
के पूर्व
81

81
96
13
चार
के /पश्चिम
95

71
96
14
चार
पी /दक्षिण
84

84
144
15
चार
पी उत्तर
71

61
187
16
पाच
एल
125

107
111
17
पाच
एम पूर्व
132

91
22
18

पाच
एम /पश्चिम
49
49
55
19
सहा
एन
92

85
67
20
सहा
एस
115
79

46
21
सहा
टी
97

82
21
22
सात
आर /दक्षिण

157
150
150
23
सात
आर /मध्य
125

125
115
24
सात
आर /उत्तर
139

129
130


एकूण
2596
2133
1936

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad