भुजबळ यांची मालकी असलेल्या कंपनीचा नवी मुंबईतील भूखंड जप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2015

भुजबळ यांची मालकी असलेल्या कंपनीचा नवी मुंबईतील भूखंड जप्त


मुंबई /प्रतिनिधी 
ऐन दिवाळसणात राष्ट्रवादीचे नेते आिण राज्याचे माजी सार्वजिनक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा झटका दिला आहे.  भुजबळ यांच्या देविशा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावे असलेला नवी मुंबईतील भूखंड सक्तवसुली संचलनालयाने जप्त केला आहे.
जप्त केलेल्या या भूखंडाची किंमत १६० कोटी रुपये आहे. १५ सप्टेबरला सक्तवसुली संचलनालयाने छगन भुजबळांविरोधात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्ड्ररिंग अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ऐन िदवाळीत भूखंड जप्तीची पुढील कारवाई ईडीने नुकतीच पूर्ण केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक िवभागाने छगन भुजबळ यांच्यावर सुरु केलेल्या धडाकेबाज कारवाईपाठोपाठ सक्तवसुली संचालनालयाने जून महिन्यात भुजबळ आणि कुटुंबियांच्या विरोधात दोन आर्थिक गुन्हे सूचना अहवाल नोंदविले होते. पहिला गुन्हे सूचना अहवाल महाराष्ट्र सदन घोटाळा व कालिना येथील भूखंड वाटप प्रकरणाचा होता. तर दुसरा गुन्हे अहवाल नवी मुंबई येथील गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भात होता.
 
ईडीने जप्त केलेला भूखंड नवी मुंबईतील खारघर मध्ये आहे. येथील भूखंडावर हेक्स वर्ल्ड हा पॉश गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येणार होता. सदनिका नोंदणीसाठी आगाऊ रक्कम म्हणून सदनिकाधारकांकडून २०१० मध्ये दहा टक्के रक्कम घेतली होती. मात्र त्याचे बांधकाम पूर्ण झालेले नाही.
 
 गुंतवणूक धारकांच्या तक्रारी पोलिसांनी घेण्यास टाळाटाळ केली होती. मात्र त्याचा मोठा गाजावाजा झाल्यानंतर या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. भूखंडाचे हस्तांतरण तांत्रीक बाबींमुळे होऊ न शकले नाही. त्यामुळे हा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करता आला नाही, असे स्पष्टीकरण कंपनी आिण भुजबळ यांच्यावतीने देण्यात आले होते.

२०१० मध्ये सदनिकाधारकांनी या प्रकल्पात जेवढी गुंतवणूक केली, तेवढीच रक्कम कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या हेक्स वर्ल्ड गृहनिर्माण प्रकल्पावर ज्या लोकांनी गुतंवणूक केली, त्यांचे सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नोडमध्ये घर घेण्याचे स्वप्न मात्र भंग पावले होते. 
---
छगन भूजबळ यांनी इंडोनेशिया आिण मलेशिया राष्ट्रामध्ये बेकायदेशीर मोठी गुंतवणूक केली असून त्यािवषयी चौकशी करावी अशी मागणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी सक्तवसुली संचलनालयाकडे केल्याचे सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad