मुंबई / अजेयकुमार जाधव
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान आणि मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांस पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की अश्या प्रकारे जाहीरात करत मुंबई मेट्रो वन प्राइवेट लिमिटेड टपावर प्रवास करण्याला प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहे. मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रशासनाने विविध माध्यमा द्वारे जनजागृती करत अश्या प्रकारे टपावर प्रवास करणा-या लोकांना प्रबोधन केले असताना ही जाहीरात त्या प्रवृत्तीना प्रोत्साहन देत आहे.
तसेच मुंबई मेट्रो वन प्राइवेट लिमिटेड द्वारा ट्वीटर वर मेट्रोच्या टपावर प्रवास करताना दाखविलेले भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण दाखवित जनतेच्या भावना सुद्धा दुखावल्या आहेत. त्यामुळे मुंबई मेट्रो वन प्राइवेट लिमिटेड या कंपनीने माफी मागत ती व्हिडीओ प्रथम हटवावी. तसेच त्यांच्या या मुर्खतेवर कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे
मुंबई मेट्रो वन प्राइवेट लिमिटेड कंपनीने मुर्खतेची सीमा पार करत चक्क ट्वीटर वर मेट्रोच्या टपावर भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाचे चित्र प्रवास करताना दाखविल्यामुळे भावना दुखावल्या असून टपावर प्रवास करण्याला प्रवृत्तीला प्रोत्साहन देत असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी करत कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान आणि मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांस पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की अश्या प्रकारे जाहीरात करत मुंबई मेट्रो वन प्राइवेट लिमिटेड टपावर प्रवास करण्याला प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहे. मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रशासनाने विविध माध्यमा द्वारे जनजागृती करत अश्या प्रकारे टपावर प्रवास करणा-या लोकांना प्रबोधन केले असताना ही जाहीरात त्या प्रवृत्तीना प्रोत्साहन देत आहे.
तसेच मुंबई मेट्रो वन प्राइवेट लिमिटेड द्वारा ट्वीटर वर मेट्रोच्या टपावर प्रवास करताना दाखविलेले भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण दाखवित जनतेच्या भावना सुद्धा दुखावल्या आहेत. त्यामुळे मुंबई मेट्रो वन प्राइवेट लिमिटेड या कंपनीने माफी मागत ती व्हिडीओ प्रथम हटवावी. तसेच त्यांच्या या मुर्खतेवर कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे
No comments:
Post a Comment