महापालिकेतर्फे पुरुष नसबंदी सप्ताह - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2015

महापालिकेतर्फे पुरुष नसबंदी सप्ताह

मुंबई : मुंबई महापालिकेच्या वतीने ७ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय जागतिक पुरुष नसबंदी दिना निमित्ताने २ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बिनटाक्याची पुरुष नसबंदी ही सुरक्षित, साधी, कमी वेळेत होणारी शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया ५ ते १० मिनिटांत करण्यात येते. ती बिनटाक्याची आणि कटरहित आहे. शस्त्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण त्वरित एका तासात घरी जाऊ शकतो. शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थ्याला १ हजार ४५१ रुपये व प्रेरणा देणाऱ्याला २०० रुपये उत्तेजनार्थ रक्कम दिली जाते. याबाबत अधिक माहितीसाठी कुटुंब कल्याण केंद्र, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल, वेळ - सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत किंवा दूरध्वनी क्रमांक : ०२२-२४१८४८४१, ०२२- २४१८०५२१ वर संपर्क साधावा असे आवाहन पालिकेने केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad