नवी मुंबई - कोकण रेल्वे प्रवाशांना आणखी एक खूषखबर आहे. दुपदरीकरण करताना कोकण रेल्वे मार्गावर 16 नवी स्थानके उभारण्यात येतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांनी दिली.
भानू तायल यांनी बेलापूरमधील कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दुपदरीकरणाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या कोकण रेल्वे मार्गावर 58 स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात दुपदरीकरण करताना 11 नवी स्थानके उभारण्यात येणार असल्याने स्थानकांची संख्या 69 वर पोहोचेल; मात्र रेल्वे मार्गावर 74 स्थानकांची गरज असल्याने नंतर आणखी पाच स्थानके उभारण्यात येणार आहेत. या मार्गावर दोन स्थानकांमधील अंतर सध्या 20 किलोमीटर आहे. ते कमी करून जवळपास 10 किलोमीटरवर आणले जाईल. तसेच या मार्गावर आणखी पॅसेंजर गाडी सुरू करण्याचा विचार असल्याचे तायल यांनी सांगितले.
दुपदरीकरण चार वर्षांत
कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे भूमिपूजन 8 नोव्हेंबरला कोलाडमध्ये होणार आहे. दुपदरीकरणाचे काम चार वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास भानू तायल यांनी व्यक्त केला. दुपदरीकरणासाठी अंदाजे दहा हजार कोटींचा खर्च येणार आहे. त्यातील 250 कोटी एलआयसी देणार असून, आईआईएफसीएल एक हजार कोटी अर्थसाह्य देणार आहे. दुपदरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 300 कोटी खर्च येणार आहे, असे तायल यांनी सांगितले.
विकासाचा मार्ग
चिपळूण-कराड हा 111 किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. हा मार्ग पुढे कोल्हापूरला जोडून साखर उद्योगाला चालना देण्यासाठी या मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर पर्यटन वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्याच्या पर्यटन मंडळांशी चर्चा सुरू आहे.
कोकण रेल्वे जयगड बंदराला जोडण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या रेल्वे मार्गाद्वारे व्यापाराला चालना मिळणार आहे.

No comments:
Post a Comment