मुंबई / प्रतिनिधी
वृक्ष प्राधिकरणाचा सन २०१६-१७ चा १२७.७४ कोटीचा अर्थसंकल्प सह आयुक्त तथा उप आयुक्त (उद्याने व सुरक्षा) शांताराम शिंदे यांनी वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष व महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना आज (२८ ऑक्टोबर, २०१५) वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत सादर केला.
मुंबईतील पानथळ प्रदेशातील तिवरांच्या झाडांच्या (Mangrows) संवर्धन आणि संरक्षणासाठी तसेच वनस्पती शास्त्रविषयक उद्यानाचा तसेच रोपवाटीकांचा विकास करण्यासाठी एकूण १२ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. आजच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत एकूण ६६ विषयांना मंजुरी देण्यात आली. आजच्या सभेला सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते धनंजय पिसाळ, इतर सदस्य, नामनिर्देशित सदस्य तसेच उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी हे मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment