दंड व लिलावातून १ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम प्राप्त
मुंबई / प्रतिनिधी - अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्या निर्देशांनुसार, उपायुक्त बापु पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रशासकीय विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेद्वारे नियमित स्वरुपात धडक कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये दिनांक १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१५ या ९ महिन्यांच्या कालावधीत एकूण १,०३,९९५ इतक्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.या कारवाई करण्यात १,३६,४४,२६८/- रुपये इतकी रक्कम दंड स्वरूपात, तर दावा न केलेल्या मालाच्या लिलावातून रुपये २४,२९,६७८/- इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. पालिकेला या कालावधीत रुपये १,६०,७३,९४६ /- इतकी एकूण रक्कम प्राप्त झाली आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व परिसरात व विशेषकरुन रेल्वे स्थानक परिसरात विशेष मोहिम सातत्याने राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते, त्यानुसार महापालिकेच्या सर्व २४ विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर नियमित स्वरुपात कारवाई करण्यात येत आहे जानेवारी महिन्यात ८३२५ फेरीवाल्यांवर कारवाई करून १४ लाख २२ हजार २८१ रुपये, फेब्रुवारीमध्ये ६७३८ फेरीवाल्यांवर कारवाई करून १२ लाख ८२८ रुपये, मार्च महिन्यात ६१७२ फेरीवाल्यांवर कारवाई करून ११ लाख ५५ हजार रुपये, एप्रिल महिन्यात ५६४९ फेरीवाल्यांवर कारवाई करून ३१ लाख ७५ हजार ४६३ रुपये, मे महिन्यात ११९१६ फेरीवाल्यांवर कारवाई करून १३ लाख ८२ हजर ९८७ रुपये, जून महिन्यात १६४५२ फेरीवाल्यांवर कारवाई करून १३ लाख ४४ हजार १९७ रुपये, जुलै महिन्यात १५८९१ फेरीवाल्यांवर कारवाई करून १५ लाख २७ हजार ४२१ रुपये, ऑगस्ट महिन्यात १६६८० फेरीवाल्यांवर कारवाई करून ४५ लाख १२ हजार ३४२ रुपये, तर सप्टेंबर महिन्यात १६१७२ फेरीवाल्यांवर कारवाई करून ३५ लाख ३४ हजार ४२७ रुपये पालिकेला दंड आणि लिलावातून प्राप्त झाले आहेत. मे २०१५ पासून अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची तिव्रता वाढविण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment