मुंबई तापाने फणफणली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2015

मुंबई तापाने फणफणली

गेल्या सात दिवसात तब्बल तीन हजार 082 रुग्ण यामध्ये  तापाचे दोन हजार 610 रुग्ण
ताप मलेरिया आणि  गॅर-टोचे  उग्र रूप
मुंबई ( प्रतिनिधी ) - पाऊस गेला तरी पावसात उदभवलेले विविध साथीच्या आजारांचा थैमान अजून मोठया प्रमाणात सुरूच असून संपूर्ण मुंबई तापाने फणफणली आहे गेल्या सात दिवसात तब्बल तीन हजार 082 रुग्ण आढळून आले असून यामध्ये तापाचे दोन हजार 610 रुग्णांचा समावेश आहे त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे या मध्ये सवाॅत जास्त रुग्ण तापाचे असून त्या खालोखाल मलेरिया आणि  गॅर-टोचे आहेत या आजारांनी उग्र रूप धारण केले आहे हे साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेचे चांगलेच धाबे दणाणले असून आजार रोखण्यासाठी पालिकेला अपयश आले आहे हे पालिकेच्या अहवालावरून पष्ट होत आहे


मुंबईत सुरू वातीला पावसाने चांगली हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने मुंबईत ताप , लेप्टो , मलेरिया , र-वाईन प-लु लेप्टो आदि आजाराने मोठ्या प्रमाणातथैमान घातले होते मात्र आता पाऊस गेला तरी विविध साथीच्या आजारांचा नायनाट करण्यास पालिकेला अध्याप जमलेले नाही त्यामुळे मुंबईकर चांगलाच हैराण झाला आहे.  पालिका आरोग्य विभागाला अजून म्हणावे तसे  आजार रोखण्यास यश पालिकेला आलेले नाही पालिका आजार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्‍न करित असून ही आजार आटोक्यात येत नसल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पाऊस नसतानाही ही परिस्थिती आहे गेल्या सप्टेंबर महिन्याच्या 30 दिवसात तब्बल 14 हजार 760 रुग्ण आढळून आले तर या ऑक्टोबर महिन्याच्या पाच दिवसांत म्हणजेच एक ते पाच ऑक्टोबर पयॅत तब्बल दोन हजार 009 आढळून आले होते तर आता सहा ते 11 ऑक्टोबर या सहा दिवसात 3 हजार 401 रुग्ण आढळून आले आहेत तर आता 12 ते 18 या सात दिवसात तब्बल तीन हजार 082 रुग्ण आढळून आले आहेत  या मध्ये तापाचे चक्क 2610 मलेरिया 202 आणि  गॅर-टो 162 रुग्णाचा समावेश आहे या आजारांनी उग्र रूप धारण केले आहे   साथीचे आजार वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पालिकेची रुग्णाल्ये रुग्णानी खचाखच भरली आहेत पालिका आरोग्य विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत

आजाराचे नाव             आढळलेले संशयीत रुग्ण
ताप                                            2610
डेंग्यू                                            40
लेप्टो                                           2
मलेरिया                                      202
गॅर-टो                                          162
र-वाईन प-लु                               2
टायफाईड                                    35
हेपेटीटीस                                      29

Post Bottom Ad