आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीच्या सौर कृषी पंप खरेदीची प्रक्रिया पूर्ण - चंद्रशेखर बावनकुळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2015

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीच्या सौर कृषी पंप खरेदीची प्रक्रिया पूर्ण - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 हजार सौर कृषिपंपांचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या पंप खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ही योजना गतिमान पद्धतीने राबवून शेतकऱ्यांना तातडीने हे सौर कृषिपंप वाटप करण्याचे निर्देश श्री. बावनकुळे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. या सौर कृषिपंप वाटप योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरण कंपनी आणि महाऊर्जा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरपंप खरेदीसाठी जैन इरिगेशन कंपनीला प्राधिकृत करण्यात आले आहे.

धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरीचे काम केलेले लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण झालेल्या गावातील शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागातील शेतकरी, तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा करणे शक्य नसलेले शेतकरी अशा एकूण 10 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad