क्यामेरामन - किरण किरतकुडवे
मुंबई / अजेयकुमार जाधव
वसंतराव नाईक महामंडळातील मागासवर्गीय अधिकाऱ्याना ब्ल्याकमेल करून आपल्या नातेवाईकांना बोगसरित्या कर्ज मंजूर करून घेणाऱ्या औरंगाबाद येथील ऑल इंडिया बंजारा टायगर्सचे अशोक राठोड यांची तसेच सामाजिक न्याय विभागाचे उप सचिव उ.शि. लोणारे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागण्यासाठी रिपब्लिकन टायगर फ़ोर्सचे विजयकुमार खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करण्यात येत आहे.
मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात उप सचिव पदावर उ.शि. लोणारे हे गेले 5 ते 6 वर्षे कार्यरत आहेत. या काळात त्यांनी चर्मकार महामंडळामध्ये भ्रष्टाचार केला आहे. महामंडलाच्या ठेवी आपल्याकडे ठेवल्या आहेत. लोणारे हे अनुसूचित जातीचे नसताना अनुसूचित जाती आयोगाकडे त्यांची चौकशी करण्यात आली नंतर ही चौकशी अचानक थांबवण्यात आली असा आरोप विजयकुमार खंडागळे यांनी केला आहे. लोणारे यांची चौकशी करून अट्रोसिटी कायद्याखाली लोणारे याच्यावर कारवाई करावी अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे.
तसेच मागासवर्गीय अधिकार्याना त्रास देणाऱ्या ऑल इंडिया टायगर्स फ़ोर्स व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे औरंगाबाद येथील अशोक राठोड आणि हिंगोली येथील संतोष बंसी राठोड यांच्या सहकाऱ्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वसंतराव नाईक महामंडलामधुन अशोक व संतोष राठोड यांनी दमदाटी करून आपल्याच नातेवाईकाना प्रत्तेकाला लाखो रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यामुले मागासवर्गीय इतर जातिना कर्ज मिळत नसल्याचा आरोप खंडागळे यांनी केला आहे.
वसंतराव नाईक महामंडलाचे पुण्यातील महाव्यावस्थापक रविंद्र कांबळे, नागपुरचे महा व्यवस्थापक प्रमोद चव्हाण, वसूली अधिकारी धर्मा बनसोड, सामाजिक न्याय विभागाचे उप सचिव लोणारे, प्रादेशिक व्यवस्थापक डि.सी. जाधव, शरद नाईक हे या भ्रष्टाचारात सहभागी असून यांची चौकशी करावी अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे. जो पर्यन्त या भ्रष्टाचार्याँविरोधात कारवाई होणार नाही तो पर्यन्त उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment