मुंबई / प्रतिनिधी
लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेकांना आपल्याला हवे तसे शिक्षण आणि आरोग्यविषयक सोयी सुविधा घेता येत नाहीत. आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील लोकांना विद्यार्थ्यांना कमी दरामध्ये चांगली आरोग्य सेवा, शिक्षण आणि कलावंतांचा सन्मान करू शकेल अश्या योजना राबवत असल्याची माहिती शक्ती ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हेमंत जांभळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शक्ती ग्रुप ऑफ कंपनीला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जांभळे बोलत होते.
खेडे गावातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती आणि योग्य सल्ला मिळत नसल्याने चांगले दर्जेदार शिक्षण घेवू शकत नाही. हि कमी पूर्ण करण्याचे काम केले जाईल. शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवण्यासाठी अश्या विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी कॉर्पोरेट, व्यावसायिक, वित्तीय, सामाजिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी एज्युकेशन आणि मोटल्स हि शक्ती ग्रुपची कंपनी काम करेल. गरीब जनतेला आर्थिक भारामुळे चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. यासाठी हेल्थकेअरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्तेक जिल्ह्यात कमी दरामध्ये विविध चाचण्या करणाऱ्या ल्याब्रोटरी उघडण्यात येणार आहेत असे जांभळे यांनी सांगितले.खेडे गावातील कलावंतांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्तेक जिल्ह्यात "सम्राट कलावंतांचा" हा रियालिटी शो आयोजित केला जाणार आहे. नाटक, नृत्य, अभिनय, गायन इत्यादी माध्यमातील कलावंताना प्रोत्साहित करून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी शक्ती ग्रुप काम करेल असे जांभळे यांनी सांगितले.
Board OF Director of Shakti Multipurpose Society Ltd.
Kishore. G. jadhav, Narendra Shenoy, R.N. Kawle, Ashok Baravarkar, Pramod Borate, Hemant D. Jambhale (CMD), Manish.a. rane, Eknath L.Bansode, Vijay Bhukan, Santosh R. Jadhav, Ravikant Mate