मुंबई (प्रतिनिधी): कुर्ला येथील सिटी किनारा हॉटेलला लागलेल्या आगीत आठ विद्यार्थ्यांचा नाहक बळी जावूनही पालिका प्रशासनाने आज स्थायी समितीत निवेदन न केल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी आयुक्तांबाबत नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर जाग आलेल्या प्रशासनाने मुंबईतील हॉटेलांमधील अनधिकृत बाबींविरोधात जी कारवाई सुरु केली आहे तीही सक्षमतेने होत नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी स्थायी समितीत हरकतीच्या मुद्द्यावर बोलताना केला. पालिका प्रशासन संवेदनहिन असल्याने अध्याप दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचे सांगत शिवसेना नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी आयुक्तांचा निषेध करीत सभा तहकूब करण्याची मागणी केली.
या घटनेनंतर पालिकेचा कोणीही जबाबदार अधिकाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई झालेली नाही. हॉटेलला परवाने कसे दिले जातात हे उघड सत्य आहे. आपण स्वतः २००८ पासून एल विभागातील अनधिकृत हॉटेलांवर कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार करीत असूनही अध्यापपर्यंत प्रशासनाकडून दखलही घेतली नसल्याचे पेडणेकर यांनी यावेळी सांगितले. प्रशासन आणखी किती जणांचे जीव जाण्याची वाट पाहणार आहे असा सवाल करीत त्यांनी संपूर्ण मुंबईत कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.
या कारवाईत अनधिकृत हॉटेल सील करून अनधिकृत सिलेंडरवरही कारवाई झाली पाहिजे असे सांगत त्यांनी आता दिसणाऱ्या गोष्टी त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांना दिसल्या नाहीत का असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला. पेडणेकर यांच्या हरकतीच्या मुद्यास विष्णू गायकवाड, शीतल म्हात्रे, सुधीर जाधव, रितू तावडे, रईस शेख, प्रमोद सावंत, रमाकांत रहाटे, असिफ झकेरिया, रमेश कोरगावकर, गटनेते मनोज कोटक, धनंजय पिसाळ, विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेकर, तसेच सभागृह तृष्णा विश्वासराव इत्यानदिंनी पाठींबा देत आपली मते प्रदर्शित केली.
आयुक्तांनी सुरु केलेली कारवाई अविरतपणे सुरु ठेवावी लोकांचा रोष थांबिण्यासाठी कारवाईचा दिखावा नको, एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्याऐवजी आरोग्य विभागाने सतत कारवाई करावी, फुटपाथवरील गैसचा वापर बंद करावा, कारवाईचे निश्चित अधिकारांचे वाटप करावे. मुंबई स्मार्ट सिटी बनविण्याऐवजी सेफ सिटी बनविण्यात यावी, चेंज ऑफ युजरवर लक्ष ठेवावे, हॉटेलला सिलेंडर देताना निकष तपासण्यात यावेत, तसेच या घटनेस जबादार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित निलंबित करावी अशा मागण्या सर्वपक्षीय नगरसेवकांकडून केल्या गेल्या.
यावर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ज्या ठिकाणी महानगर गैस उपलब्ध आहे तेथे त्याचा वापर करण्यासाठी कायद्यात तरतूद करावी, अशी सूचना करीत आयुक्तांनी सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन पुढील बैठकीत यावर सविस्तर माहिती सादर करावी असे आदेश दिले .