मुंबई / मुकेश धावडे, ता. 21
हार्बर मार्गावरील वडाळा रोड स्थानकतील फलाट क्रमांक 4 वर 15 डब्याच्या लोकलच्या दृष्टीने फलाट वाढविण्याच्या काम सुरु होते. मात्र फलाट वाढवण्यासाठी आणलेले डेब्रिज, सिमेंट, खडी, रेती आदि साहित्य गेल्या सहा महिन्यांपासून जागच्या जागी पडून असल्याने येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या डेब्रिजवर जंगली झाडे वाढू लागली आहेत. तर अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव ही वाढला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील रेल्वे प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वडाळा रोड स्थानक हे हार्बर मार्गावरील मुख्य स्थानक आहे. येथून वाशी, पनवेल, बेलापूर तसेच वांद्रे आणि अंधेरी लोकल त्यामुळे या स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. त्यात वडाळा पूर्व येथील बीपीटी वसाहतीत तेजस नगर, सदभावना नगर, कर्तव्य नगर, न्यू कॉलनी आणि ओल्ड कॉलनी मिळून साधणार पाच हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. येथील नागरिकांना ये - जा करण्यासाठी वडाळा स्थानकाचा वापर करावा लागतो मात्र या स्थानकातून सीएसटी दिशेला जाणाऱ्या लोकलच्या फलाट क्रमांक 4 वर 15 डब्याच्या लोकलच्या दृष्टीने फालट वाढविण्याच्या काम सुरु होते. परंतु हे काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे फलाट क्रमांक 4 वर रेल्वे कर्मचाऱ्यांनी फलाटाच्या कामांसाठी आणून ठेवलेले डेब्रिज, सिमेंट, खडी, रेती आदि साहित्य गेल्या सहा महिन्यांपासून जागच्या जागी पडून असल्याने येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या डेब्रिजवर जंगली झाडे वाढू लागली आहेत. तर अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव ही वाढला आहे. त्यामुळे स्थानकालगतच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर या डेब्रिज मधून बाहेर येणारी खडी थेट रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी सरकण्याचे प्रकारही येथे दिवसाआड घडत आहेत. परंतु या गंबीर समस्येकडे रेल्वे प्रशासनने पूर्णता दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील रेल्वे प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केला आहे.
फलाट क्रमांक 4 वर सुरु असलेले काम अचानक बंद करण्यात आले आहे. परंतु येथील डेब्रिज अद्याप उचलण्यात आलेले नसल्याने वसाहतीतील नागरिकांना येथून ये - जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे अंध, अपंग, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना या डेब्रिजचा नाहक त्रास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्येचे तत्काळ लक्ष देऊन येथील डेब्रिज हटवणे गरजेचे आहे. असे उपशाखाप्रमुख विशाल भोसले यांनी सांगितले . याबाबत वडाळा सहायक स्टेशन व्यवस्थापक विजू जॉन यांच्याशी चर्चा केली असता या फलाटाची तात्काळ पाहणी करून वरिष्ठानच्या सूचनेनुसार येथील डेब्रिज व साहित्य हटविण्यात येईल असे जॉन यांनी सांगितले.