मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यालयात घटनाबाह्य नियुक्त्या केल्या असून, हे अधिकारी सध्या हेर म्हणून वावरत आहेत. फडणवीस यांनी या अधिकाऱ्यांना तातडीने कामावरून काढावे; अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला.
मद्रास उच्च न्यायालयातील एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. या याचिकेवर निर्णय देताना सरकारी सेवेतील मागच्या दारातून केलेल्या नियुक्त्या घटनाबाह्य ठरविण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता आपल्या कार्यालयात घटनाबाह्य नियुक्त्या केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या रविकिरण देशमुख यांना सहसचिवाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच श्रीकांत भारती, निधी कामदार, प्रिया खान, कौस्तुभ धवसे, सुमित वानखेडे, केतन पाठक यांना विशेष कार्य अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच सचिवांना वाटप करावयाची निवासस्थाने आणि लाल दिव्याच्या गाड्या यांना बहाल करण्यात आल्या आहेत. या हेरांचा म्होरक्या कोण आहे, दिल्लीतील आहे की गुजरातमधील असा सवाल मलिक यांनी केला.
No comments:
Post a Comment