एशियाटिक सोसायटीकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखितांचे डिजीटायझेशन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2015

एशियाटिक सोसायटीकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखितांचे डिजीटायझेशन

मुंबई : एशियाटिक सोसायटी या संस्थेकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथसंपदा, ऐतिहासिक नाणी, दुर्मिळ हस्तलिखिते यांचे डिजीटायझेशन करण्यात येणार आहे. दुर्मिळ ग्रंथ आणि हस्तलिखितांचे कायमस्वरुपी जतन करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
एशियाटिक सोसायटी ही संस्था 200 वर्षापूर्वी स्थापन झालेली असल्यामुळे या संस्थेकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथांचे आणि हस्तलिखितांचे डिजीटायझेशन करण्यासाठी सन 2015-16 या आर्थिक वर्षात 5 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना सन 1804 मध्ये झाली आहे. सन 1950 पासून राज्य शासनाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची स्थापना करुन एशियाटिक सोसायटीस राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचे काम करण्याचे निर्देश दिले होते. एशियाटिक सोसायटी संस्थेकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे डिजीटायझेशन करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची प्रत www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad