रस्त्यावरील घाण आणि फुटक्या गटारांमुळे जोगेश्वरीमधील नागरिक त्रस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 October 2015

रस्त्यावरील घाण आणि फुटक्या गटारांमुळे जोगेश्वरीमधील नागरिक त्रस्त


मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगर पालिकेच्या के पूर्व विभागाच्या हद्दीत येणाऱ्या वार्ड क्रांक ७० मधील घाणीचे साम्राज्य आणि फुटलेली गटारे यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेच्या के पूर्व विभागाने त्वरित कारवाई करून नागरिकांना चांगले वातावरण निर्माण करून द्यावे अशी मागणी सत्यवादी एन. जी. ओ. संस्थेने पालिकेकडे केली आहे. 

जोगेश्वरी पूर्व येथील वार्ड क्रमान ७० मध्ये ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या कडेला कचरा पडलेला असतो तो वेळेवर उचलला जात नाही. गटारे फुटून वाहत आहेत. वार्ड मध्ये पसरलेल्या घाणी आणि कचऱ्यामुळे नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारख्या साथीच्या रोगांना बळी पडावे लागत आहे. विभागात रोगराई पसरत असल्याने नागरिक आजारांनी त्रस्त झाले आहेत. लोकांची समस्या सोडवावी म्हणून स्थानिक नगरसेवक भालचंद्र अंबुरे यांना वेळोवेळी तक्रार केली आहे.परंतू अंबुरे यांनी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने सत्यवादी एन. जी. ओ. चे उत्तर जिल्हा अध्यक्ष सय्यद हयात हुसेन, महिला अध्यक्षा जुलेखा हयात हुसेन, अख्तर मिर्जा, युसुफ खान, जावेद वाजिद खान, मोहम्मद फिरोज शेख, सुधीर शिंदे, यासीन पठाण इत्यादी नागरिकांनी पालिकेच्या के पूर्व विभागाच्या सह्हाय्क आयुक्त भाग्यश्री कापसे यांना पत्र दिले आहे. नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याने पालिकेने तरी नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad