मुंबई : चित्रनगरीचा विकास करुन मुंबईची ओळख ‘एंटरटेनमेंट हब’ अशी निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘जिओ मामि 17 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडिया येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, किरण राव यांच्यासह चित्रपट जगतातील दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय लोक हे चित्रपट आणि क्रिकेटप्रेमी आहेत. येथील लोक चित्रपट व क्रिकेटला धर्म मानतात. भारतात बनणाऱ्या चित्रपटांपैकी 60 टक्के चित्रपटांची निर्मिती एकट्या मुंबईत होते. चित्रपट उद्योग हा येथील रोजगार निर्मितीचे मोठे केंद्र आहे. जागतिक दर्जाच्या चित्रपटाची निर्मिती मुंबईत व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई फिल्म फेस्टिव्हलला यापुढेही शासनाचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

No comments:
Post a Comment