बाबासाहेबांच्या स्मारकाच्या नावाने होणाऱ्या जॉगर्स पार्कला विरोध - आनंदराज आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 October 2015

बाबासाहेबांच्या स्मारकाच्या नावाने होणाऱ्या जॉगर्स पार्कला विरोध - आनंदराज आंबेडकर


मुंबई /  अजेयकुमार जाधव 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिल मधील जागेत होत आहे.हे स्मारक म्हणजे मुंबई मध्ये आणखी एक डॉ. आंबेडकर उद्यान बनणार आहे. या उद्यानात आजू बाजूच्या लोकांचे जॉगर्स पार्क होईल. शशी प्रभू यांनी बनवलेल्या संकल्प चित्र पाहिल्यावर हे स्मारक दिसत नसल्याने आमचा आणि आंबेडकरी जनतेचा याला विरोध आहे. यामुळे स्मारकाच्या नावाने होणाऱ्या उद्यान, जॉगर्स पार्कला आमचा विरोध आहे असे रिपब्लिकन सेनेचा विरोध आहे असे आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शशी प्रभू यांनी जे संकल्पचित्र बनवले आहे यात १२ ते १३ हजार लोक बसू शकतील असा भव्य स्तूप बनवण्यात येणार आहे. हा स्तूप कुठूनही दिसत नाही. बनवण्यात येणार स्तूप हा सर्व बाजूने उघडा असणार असल्याने ऊन आणि पावसात याचा काहीही उपयोग होणार नाही असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर यांचे स्मारक आंबेडकरी जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे असावे असेही आनंदराज म्हणाले. इंदू मिल मधील स्मारकात जगातील सर्वात मोठा असा बाबासाहेबांचा पुतळा बनवावा अशी मागणी आनंदराज यांनी केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनवण्यासाठी सरकारने सुकाणू समिती बनवली आहे. या सुकाणू समितीची बैठक न लावताच शशी प्रभू यांच्या सनकल्प चित्राला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आमचा या आराखड्याला विरोध आहे असे आनंदराज म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमी मेक इन इंडियाच्या बाता मारत असतात. मग बाबासाहेबांच्या स्मारकाचे संकल्प चित्र बनवताना ५ कोटीचे काम केल्याची अट घालण्यात आली होती. हि अट भारतातील आर्किटेक पूर्ण करू शकत नसल्याने परदेशी आर्किटेकच्या सहाय्याने निविदा भरण्यात आल्या असे आनंदराज यांनी सांगितले. 

देशातील मंत्री खासदार अत्यंत बेजाबदार वक्तव्य करीत आहे. याचा जाहीर निषेध करत अश्या मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी आनंदराज यांनी केली. वेदाचे प्रमाण देवून गाईची मुद्दा काढून अल्पसंख्यांक समाजाला मारले जात आहे. हे कायद्याचे उल्लंघन आहे. हा देश वेदावर चालत नसून राज्य घटनेवर चालत आहे याची जाणीव सरकारने ठेवावी असे आवाहन आनंदराज यांनी केले. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार या अताम्हात्यांकडे निष्क्रियपणे पाहत आहे याचा निषेध करत रिपब्लिकन सेना या विरोधात जनजागरण आंदोलन करण्याचा इशारा आनंदराज यांनी दिला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad