मुंबई / प्रतिनिधी - महापालिकेद्वारे उपहारगृहांची करण्यात येत असलेल्या तपासणी दरम्यान अनधिकृत सिलेंडर्सचा साठा देखील जप्त करण्यात येत आहे. दि. १९ ते २७ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलेल्या तपासणीमध्ये आजपर्यंत १०३६ अनधिकृत सिलेंडर्स महापालिकेच्या विशेष चमूद्वारे जप्त करण्यात आले आहेत.
दि. १६ ऑक्टोबर २०१५ रोजी कुर्ला परिसरातील एका उपहारगृहात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर महापालिका क्षेत्रातील सर्व उपहारगृहांची तपासणी महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. या तपासणीसाठी व योग्य त्या कारवाईसाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागात प्रत्येक विभागस्तरावर एका विशेष चमूचे गठन करण्यात आले होते. सदर चमूद्वारे सर्व विभागांमध्ये उपहारगृहांच्या तपासण्या करण्यात येत आहेत.
महापालिका क्षेत्रातील अनेक उपहारगृहांमध्ये त्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक सिलेंडर्स अनधिकृतरित्या ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. हे सर्व अनधिकृत सिलेंडर्स महापालिकेद्वारे जप्त करण्यात आले आहेत. याबाबत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक म्हणजे ११४ अनधिकृत सिलेंडर्स आर / दक्षिण विभागाच्या चमूद्वारे जप्त करण्यात आले आहेत.
विभागनिहाय आकडेवारी
- अनु. क्र.परिमंडळविभागकारवाई सुरु केल्यापासूनजप्त केलेल्या सिलेंडर्स ची एकूण संख्या1एकए312एकबी393एकसी094एकडी155एकइ636दोनएफ / दक्षिण457दोनएफ / उत्तर228दोनजी / दक्षिण639दोनजी / उत्तर4510तीनएच / पूर्व5111तीनएच / पश्चिम1912तीनके / पूर्व3113चारके / पश्चिम5114चारपी / दक्षिण2415चारपी / उत्तर7316पाचएल9317पाचएम / पूर्व2218पाचएम / पश्चिम2919सहाएन2320सहाएस1021सहाटी1522सातआर / दक्षिण11423सातआर / मध्य6824सातआर / उत्तर81एकूण1036
No comments:
Post a Comment