मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिका परिमंडळ - ४ मध्ये विविध उपहारगृहांवर पालिकेने धडक कारवाई करुन अनेक गॅस सिलेंडर्स, शेगडय़ा व टेबल खुर्च्या, ओव्हन, इलेक्ट्रीक शेगडी इत्यादी मुद्देमाल जप्त केला आहे
पालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी परिपत्रक क्रमांक अति.आ./पउ/एल/६२८३,अन्वये दिलेल्या निर्देशांनुसार परिमंडळ-४ चे उप आयुक्त .किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध हॉटेल्सवर मोठय़ा प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली. सदर धडक कारवाईमध्ये अंधेरी (पश्चिम) विभागातील आकाश स्वीट्स येथील मोकळय़ा भागातील अनधिकृत शेड तोडण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील उपहारगृहावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ७ गॅस सिलेंडरसह ३ टेबल, ८ खुर्च्या, भांडी, १० स्टील रॅक्स इत्यादी जप्त करण्यात आले तल. अंधेरी येथील जे.पी. मार्गावरील कटील उपहारगृहाची तात्पुरती शेड जमीनदोस्त करण्यात आली. तसेच या ठिकाणाहूनही २ गॅस सिलेंडर, १० खुर्च्या, ३ लाकडी टेबल, १ फ्रिज, १ स्टील काऊंटर इत्यादी सामान जप्त करण्यात आले. याच धर्तीवर मालाड (पश्चिम) मधील जोडमार्गावरील हॉटेल श्रीनाथजी, बालाजी फूड्स यावर कारवाई करण्यात आली. कुर्ला येथील हॉटेल सिटी किनारा येथे घडलेल्या दुर्घटनेस कारणीभूत परिस्थितीसारखी स्थिती बालाजी फूड्स येथे आढळली. या ठिकाणाहून गॅस सिलेंडर्स व शेगडय़ा जप्त करण्यात आल्या. पी/दक्षिण विभागात चायना गेट उपहारगृह, सबकुछ फुड प्लाझा, सनशाईन तसेच कसबाह या हॉटेल्सवर कारवाई करुन शेड जमीनदोस्त करण्यात आल्या. या ठिकाणांहूनदेखील गॅस सिलेंडरसह सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे