मुंबई ( प्रतिनिधी ) - सिटी किनारा या गैस सिलेंडर स्फोट दुर्घटनेत ७ विध्यार्थींसह ८ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्घटनेस जबाबदार व दोषी असणाऱ्या हॉटेल मालक व पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कडक करावी,अशी मागणी मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर स्नेहल आंबेकर,आयुक्त अजोय मेहता यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
सिटी किनार हॉटेल हे झोपडपट्टी परिसरात मध्यभागी असून तेथे हॉटेल व्यवसाय करण्यास हॉटेल मालकाला परवाना कसा काय दिली ? अग्निशमन दल, आरोग्य खाते, दुकाने व परवाने विभाग यांनी या हॉटेल बाबत काय पाहणी केली होती व काय दक्षता घेतली होती. मुंबईत सिटी किनारा सारखी इतरही हॉटेल सुरु आहेत. पालिकेचे अधिकारी काय करतात ? असा सवालही लांडे यांनी केला आहे सदर दुर्घटना पाहता व त्यात झालेली जीवित हानी पाहता या सर्व घटनाप्रकारास पालिका अधिकारी व हॉटेल मालक हेच जबाबदार असल्याचा आरोप लांडे यांनी केला आहे. यास्तव हॉटेल मालक व पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी लांडे यांनी केली आहे.