रोजंदारी आणि ग्रामीण आरोग्य अभियान कर्मचार्यांना पालिकेने बोनस द्यावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 October 2015

रोजंदारी आणि ग्रामीण आरोग्य अभियान कर्मचार्यांना पालिकेने बोनस द्यावा

मुंबई / प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक व उपनगरीय रुग्णालयात २००९ पासून ५०० रोजंदारी कामगार काम करत आहेत. त्यांना महापालिकेकडून वेतन दिले जाते. सन २०१३-१४ च्या आर्थिक वर्षात सानुग्रह अनुदान देण्यासाठी काढण्यात आलेल्या परिपत्रकात या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला होता होता. सन २०१४ - १५ चा बोनस वाटताना रोजंदारी कर्मचाऱ्यांचा उल्लेख करून बोनस द्यावा. महापालिकेच्या आरोग्य विभागात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत प्रजनन व बाल आरोग्य -२ मध्ये १०४ कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१४ पासून कायमस्वरूपी करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यानाही बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. तरी अश्या कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad