यंत्रमागधारक ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या विजेच्या दरात सुधारणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2015

यंत्रमागधारक ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या विजेच्या दरात सुधारणा

मुंबई / प्रतिनिधी - राज्यातील महावितरण कंपनीच्या लघुदाब यंत्रमाग उद्योगांच्या वीज दरात सूसुत्रता आणण्यासाठी उच्चदाब यंत्रमाग ग्राहकांची वीज दरातील सवलत बंद करून या सवलतीपोटी देण्यात येणारे अनुदान आता लघुदाब यंत्रमाग ग्राहकांच्या अनुदानात समाविष्ट करून सुधारित दर आकारण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

शासनाकडून यंत्रमागधारकांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येते. आजच्या या निर्णयामुळे लघुदाब ग्राहकांसाठी असलेल्या सवलतींच्या 2.57 रूपये प्रती युनिट वीजदरात सुमारे 9 पैसे वाढ होऊन उच्च आणि लघुदाब या दोन्ही यंत्रमाग उद्योगांसाठी 2.66 रूपये प्रती युनिट दर आकारण्यात येणार आहे. हे सुधारित दर 1 जून 2015 पासून लागू करण्यात येणार आहेत.

यंत्रमागधारकांना 2013 पासून सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येत आहे. हे वीज दर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून निश्चित केले जातात. त्यानंतर 1 जून 2015 मध्ये सुधारित वीज दर लागू केलेले आहेत. या वीज दरामध्ये 27 अश्वशक्तीच्या आतील लघुदाब यंत्रमागधारकांच्या वीज दरामध्ये 27 अश्वशक्तीपेक्षा जास्त भार येणाऱ्या यंत्रमाग ग्राहकांच्या दराच्या तुलनेत अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे लघुदाब यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींकडून वीज दरामध्ये सवलत देऊन अनुदानात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार यापुढे उच्चदाब यंत्रमागधारकांना देण्यात येणारी सवलत बंद करण्यात येणार असून 27 अश्वशक्तीपेक्षा कमी आणि जास्त जोडभार असणाऱ्या लघुदाब यंत्रमागधारकांना 2.66 रूपये प्रती युनिट असा समान वीजदर आकारण्यात येणार आहे. या सवलतीच्या दरासोबत उच्चदाब यंत्रमाग तसेच दोन्ही प्रवर्गातील लघुदाब यंत्रमागधारकांना वाढीव स्थिर आकार द्यावा लागणार आहे. तसेच सलवतीच्या दराव्यतिरिक्त इंधन समायोजन आकार किंवा अन्य प्रकारच्या दंडात्मक आकार यंत्रमागधार ग्राहकांनी 100 टक्के भरणे आवश्यक आहे.

वीज दरातील सवलतीमुळे महावितरण कंपनीस होणाऱ्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून देण्यात येणारे अनुदान यापुढेही कायम ठेवण्यात आले आहेत. भविष्यात वीज नियामक आयोगाने मंजूर केलेला वीजदर यंत्रमागधारकांनी भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS