काँग्रेसच्या काळात डाळ २४ रुपयांवरुन ५५ रुपयांवर गेली होती, तर त्या भीषण महागाईविरोधात हेमामालिनी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी (गॉगल लावून) आंदोलन केलं होतं. आज भाजपच्या राज्यात डाळ २०० रुपये प्रतिकिलो असताना निषेध करणारेभाजपाचे खासदार आता कुठेही दिसत नाही, असा आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.
ऐन सणासुदीच्या दिवसात जीवनाश्यक वस्तूंच्या महागाईने सामान्य जनता त्रस्त झालेली आहे, जी महागाई काँग्रेसच्या राज्यात डायन होती, तीच आज विकास म्हणून निर्लज्जपणे मिरवली जातेय, असे मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. जर तुरडाळ पाकिस्तानात ७० रुपये, बांगलादेशात ६५ रुपये, नेपाळ मध्ये ६८ रुपये, बर्मा मध्ये ७२ रुपये, श्रीलंकेत ६४ रुपयांनी मिळते, तर भारतात २००हुन अधिक रुपयात का? गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरडाळीच्या भावात १८० % वाढ झालेली आहे, अशा परिस्थितीत साठेबाजीवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
सदर थाळी – लाटणे मोर्चात
मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत माजी खासदार एकनाथ गायकवाड, राज्यसभा खासदार हुसेन दलवाई, मुंबईकॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, आमदार असलम शेख, कालिदास कोळंबकर, वर्षाताई गायकवाड, भाई जगताप, माजी आमदार राजहंस सिंह, चरण सिंग सप्रा,चंद्रकांत हंडोरे, श्याम सावंत, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे व मनपा विरोधी पक्षनेता बाळा आंबेरकर, मुंबई काँगेस उपाध्यक्ष अमरजित सिंग मनहास, जयप्रकाशसिंह, सरचिटणीस धर्मेश व्यास, संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष गणेश कांबळे, मुंबई अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन राईन,जिल्हाध्यक्ष जिया-उर रेहमान वाहिदी, हुकुमराज मेहता, सुनील नरसाळे, अशोक सुत्राळे,वेल्लुस्वामी नायडू, नगरसेवक / नगरसेविका, मुंबई कॉंग्रेस पदाधिकारी, मुंबई युथ कॉंग्रेसपदाधिकारी, एनएसयुआय पदाधिकारी, सेवादल पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, वार्ड अध्यक्षआदी व कार्यकर्ते उपस्थित होते...