नाले आंच्छान्दित करण्यास पालिका प्रशासनाकडून विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2015

नाले आंच्छान्दित करण्यास पालिका प्रशासनाकडून विरोध


मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबईतील नाल्यांमध्ये  टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यास प्रतिबंद करण्यासाठी तसेच  जीवितहानी टाळण्यासाठी  सदर नाले 'डोम' ने आंच्छान्दित  करण्याची सूचना शिवसेना नगरसेवका ज्योती वैती यांनी केली होती. मात्र सदर सूचना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे कारण सांगत पालिका प्रशासनाकडून फेटाळण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेकडून नालेसफाई साठी दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात.  सन २०१५ आणि २०१६ या दोन वर्षासाठी २९० कोटी रुपयांची नालेसफाईसाठीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. असे असतानाही कंत्राटदारांकडून नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याचा आरोप सत्ताधारी सोडून सर्व पक्षयीयांकडून केला जातो. यावर पालिका आयुक्तांनी केलेल्या चौकशीतही  नालेसफाई कामात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. असे असताना नालेसफाईवर दरवर्षी करोडो रुपयंची उधळपट्टी करण्या एवजी जर वैती यांच्या सूचनेनुसार नाले 'डोम'ने आंच्छान्दित केल्यास दरवर्षी नालेसफाई वर होणारा करोडो रुपयंचा खर्च वाचू  शकेल. परंतु आपले आर्थिक हितसंबंध सांभाळण्यासाठी पालिकेकडून अशा चांगलाय सूचनांचा केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप काही नगरसेवकांकडून केला जात आहे

नाल्यांवर डोम (एफआरबी कव्हर) आंच्छान्दित केल्यास नालेसफाईच्या कामात अडथळे निर्माण होवू शकतात. तसेच बहुतांश नाले हे झोपडपट्टी वसाहतीमधून वाहत असल्याने नाल्यांचे कव्हर तसेच लोखंडी ढाचे  चोरी होण्याची शक्यता असल्याचा जावई शोध पालिका प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. तसेच लहान मुले खेळताना त्यावर चढून अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही कल्पना हास्यस्पद असून नाले ओपन असताना अपघाताची शक्यता अधिक असते. असे असताना सदर सूचना फेटाळण्यासाठी केलेला आटापिटा असल्याचे  दिसून येत आहे. 

Post Bottom Ad